India vs Sri Lanka Match Tied Super Over Wach : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुपर फोरमधील अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. भारतीय संघाने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या ताफ्यातून सलामीवीर पथुम निसंका याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने तगडी फाईट दिली. हर्षित राणा घेऊन २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना श्रीलंकेच्या फलंलदाजांनी दोन धावा काढल्या अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. क्षेत्ररक्षणातील गडबड घोटाळ्यामुळे टीम इंडियानं मॅच गमावलीच होती. पण शनाकानं दुसरी धाव घेतल्यावर डाइव्ह मारली अन् मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकातील ड्रामा, पहिल्या चेंडूवर विकेट अन् ...
भारतीय संघाने दिलेल्या २०३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला अखेरच्या षटकात १२ धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं चेंडू हर्षित राणाकडे सोपवला. हर्षित राणानं पहिल्याच चेंडूवर शतकवीर निसंकाला आपल्या जाळ्यात अडकवले अन् टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. वरुण चक्रवर्तीनं त्याचा झेल टिपला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जनिथ लियानागे आणि शनाकाने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार केला. लियानगेनं या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने सेट झालेल्या शनाकाला स्ट्राइक दिले. चौथ्या चेंडूवर शनाकानं २ धावा घेतल्या. अखेरच्या २ चेंडूत ७ धावांची गरज असताना शनाकाच्या भात्यातून एक चौकार आला अन् सामन्यात ट्विस्ट निर्माण झाले.
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
शेवटच्या चेंडूवर फिल्डिंगमध्ये गडबड घोटाळा, शनाकामुळं झाकली गेली अक्षर पटेलची चूक
अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती. एका मोठ्या फटक्यासह त्यांना विक्रमी विजय मिळवण्याची संधी होती. दुसरीकडे हर्षित राणावर चेंडू निर्धाव न टाकता मोठा फटक्यापासून वाचण्याचे चॅलेंज होते. हर्षित राणानं आपलं काम केलं. पण त्यातही श्रीलंकेच्या जोडीनं दुहेरी धाव घेतली अन् सामना टाय झाला. फिल्डिंगमध्ये गडबड झाली. क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम असलेल्या अक्षर पटेल शनाकानं मारलेला फटका अडवताना थोडा गडबडला. त्याला थ्रोही करता आला नाही. त्याची ही चूक टीम इंडियाला पराभवाच्या खाईत घेऊन जाणारी अशी होती. शनाकानं त्याच्यापेक्षा मोठी चूक केली. तो गडबडलाय हे त्याला ठावुकच नव्हते. तो दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी विनाकारण धडपडला. त्याने डाइव्ह मारली अन् तिसऱ्या धावेसह मॅच जिंकण्याची संधी त्याने गमावली. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.