Costliest apartment deal in India : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देशातील सर्वात महागडं घर; २४० कोटींच्या पेंटहाऊसची विक्रमी खरेदी, Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:14 PM2023-02-11T12:14:21+5:302023-02-11T12:24:44+5:30

Costliest apartment deal in India : शिवसेना आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

मुंबईतील वरळीमधील एका इमारतीमध्ये असलेल्या आलिशान पेंटहाऊसची विक्रमी भावात विक्री झाली आहे. हे पेंटहाऊस तब्बल २४० कोटींना विकले गेले आहे. भारतातील ही सर्वात महागडी डील असल्याचं बोललं जातंय.

वेलस्पून समूहाचे चेअरमन बी. के. गोयंका यांनी वरळीत अॅन बेझंट रोड असलेल्या थ्री सिक्स्टी वेस्ट या आलिशान प्रोजेक्टमध्ये हे पेंटहाऊस घेतलं आहे. हे पेंटहाऊस 'थ्री सिक्स्टी वेस्ट'मधील 'बी' टॉवरमध्ये ६३व्या, ६४व्या आणि ६५व्या मजल्यावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे पेंटहाउस ३० हजार स्क्वेअ फूटवर पसरलेले आहे आणि हा व्यवहार दोन दिवसांपूर्वी झाल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले. भारतात विकले गेलेले आतापर्यंतचे हे सर्वांत महागडे अपार्टमेंट असल्याचेही या वृत्तात म्हटले गेले आहे.

उद्योगपती बी. के. गोयंका यांनी थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टमध्ये २४० कोटींना पेंटहाऊस घेतलं असलं तरी येत्या काळात यापेक्षा आणखी मोठ्या किमतीत या प्रकल्पात पेंटहाऊसची खरेदी होण्याचा अंदाज आहे.

या प्रोजेक्टमध्ये दुसऱ्या विंगमधील एक पेंटहाऊस खरेदी करण्यात आले आहे आणि ते बिल्डर विकास ओबेरॉय यांनी २४० कोटींना खरेदी केलं आहे. बिल्डर ओबेरॉय यांचाच हा प्रोजेक्ट आहे.