१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:32 IST2026-01-01T13:19:59+5:302026-01-01T14:32:54+5:30
The Billionaire Uber Driver : १६०० कोटींच्या आसपास संपत्ती असलेली व्यक्ती रोज टॅक्सी चालवते असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण, ही सत्य घटना आहे.

फिजीमधील एका ८६ वर्षीय वृद्ध टॅक्सी चालकाचा व्हिडिओ भारतीय उद्योजक नव शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये या चालकाच्या साध्या राहणीमानामागील मोठे सत्य समोर आले.

ही वृद्ध व्यक्ती कोणी सामान्य टॅक्सी चालक नसून तब्बल १७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १५७५ कोटी रुपये) वार्षिक उलाढाल असलेल्या एका मोठ्या बिझनेस साम्राज्याचे मालक आहेत.

या ८६ वर्षीय व्यक्तीचे स्वतःचे १३ दागिन्यांचे शोरूम (ज्वेलरी स्टोअर्स), ६ रेस्टॉरंट्स, ४ सुपरमार्केट आणि एक स्थानिक वृत्तपत्र असा मोठा व्यवसाय आहे.

त्यांच्या वडिलांनी १९२९ मध्ये अवघ्या ५ पाउंडांपासून हा व्यवसाय सुरू केला होता, ज्याचा त्यांनी आज एका विशाल साम्राज्यात विस्तार केला आहे.

एवढी मोठी श्रीमंती असतानाही केवळ छंद म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी नव्हे, तर एका उदात्त हेतूने ते आजही उबर टॅक्सी चालवण्याचे काम करतात.

टॅक्सी चालवून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नातून ते दरवर्षी भारतातील २४ मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात; त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ते स्वतः कष्ट करतात.

त्यांना स्वतःला तीन मुली आहेत. आपल्या मुलींप्रमाणेच इतर गरजू मुलींनीही स्वतःची स्वप्ने पूर्ण करावीत, ही त्यांची त्यामागील भावना आहे.

श्रीमंतीचा डामडौल न मिरवता, केवळ समाजाचे देणे लागते या भावनेने काम करणाऱ्या या वृद्ध अरबपतीची गोष्ट आज जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

















