२०० अपघात होऊनही 'लिअरजेट'लाच का असते VIP ची पसंती? अजितदादांच्या विमानाची संपूर्ण कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:57 IST2026-01-28T12:34:50+5:302026-01-28T12:57:48+5:30

Ajit Pawar Learjet Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेतील अपघातग्रस्त विमानाची माहिती आता पुढे आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेले Learjet हे जागतिक स्तरावर चार्टर्ड विमानांच्या श्रेणीत अतिशय लोकप्रिय मानले जाते. विशेषतः उद्योगपती आणि व्हीआयपी प्रवासासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

या विमानाचा कमाल वेग साधारणपणे ताशी ८६० किलोमीटर इतका प्रचंड आहे. हे विमान अवघ्या १८ ते २० मिनिटांत ४१ हजार फूट उंचीपर्यंत झेप घेण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होते.

या विमानात एकावेळी ६ ते ८ प्रवासी अत्यंत आरामात बसू शकतात. विमानातील केबिनची उंची साधारण ६ फूट असल्याने प्रवाशांना हालचाल करणे सोपे जाते.

बारामतीसारख्या विमानतळांवर जिथे रनवे लहान असतो, तिथे टेक-ऑफ आणि लँडिंग करण्यासाठी हे विमान अत्यंत प्रभावी मानले जाते. याच कारणामुळे चार्टर्ड फ्लाइटसाठी हे विमान पहिली पसंती असते.

या विमानात 'Pratt & Whitney' कंपनीचे दोन टर्बोफॅन इंजिन बसवलेले असतात. हे इंजिन इंधन बचतीसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी (सुमारे ४,००० किमी) अत्यंत कार्यक्षम मानले जातात.

या विमानात 'Pratt & Whitney' कंपनीचे दोन टर्बोफॅन इंजिन बसवलेले असतात. हे इंजिन इंधन बचतीसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी (सुमारे ४,००० किमी) अत्यंत कार्यक्षम मानले जातात.

या विमानात वाय-फाय, सॅटेलाईट फोन, डिजिटल फ्लाईट कंट्रोल सिस्टीम आणि प्रगत नॅव्हिगेशन यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सुरक्षेसाठी यात प्रगत 'सेफ्टी फीचर्स' देखील देण्यात आले आहेत.

विलियम पॉवेल लियर यांनी १९६० मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. पुढे ही कंपनी बॉम्बार्डियर एरोस्पेसकडे आली. कंपनीने २०२१ पासून या श्रेणीतील विमानांचे उत्पादन बंद केले असले तरी, जुन्या विमानांची देखभाल आजही सुरू आहे.

जगभरात या श्रेणीतील विमानांचे आतापर्यंत सुमारे २०० अपघात नोंदवले गेले आहेत. असे असूनही, त्याच्या वेगामुळे आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानामुळे या विमानाची मागणी आजही कायम आहे. मात्र, बारामतीच्या दुर्घटनेने या विमानातील सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.