Share Market Investment: १८ वर्षांनी येतोय TATA चा नवा IPO! कमाईची सुवर्ण संधी सोडू नका; आतापासूनच पैसे तयार ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 01:30 PM2022-11-17T13:30:32+5:302022-11-17T13:37:23+5:30

Share Market Investment: पुण्यात हेड ऑफिस असलेल्या टाटा समूहातील या कंपनीचा आयपीओ येत असून, टाटाची ही कंपनी नफ्यात असल्याचे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला देशात विश्वासार्ह नाव म्हणून टाटा समूहाकडे पाहिले जाते. TATA ग्रुपमधील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये विक्रमी घोडदौड करताना दिसत आहेत. टाटाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंतही केलेले आहे.

TATA समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर थोडे थांबा. कारण गुंतवणुकीची एक उत्तम संधी तुमच्यासाठी येणार आहे. १८ वर्षांनंतर टाटा समूहाच्या एका कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे.

TATA कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) आयपीओ १८ वर्षांपूर्वी २००४ मध्ये आला होता. त्यानंतर आता टाटा समूह टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ (Tata Tech IPO) आणण्याच्या तयारीत आहे. टाटा टेक ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे.

TATA ची ही कंपनी सन २०२४ च्या पहिल्या तिमाहिती IPO आणण्याचा विचार करत आहे. कंपनी येत्या तिमाहीत सेबीकडे कागदपत्रे सादर करण्याची शक्यता असून आताच्या घडीला मर्चंट बँकर्सशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

TATA Tech कंपनी IPOद्वारे विक्रीसाठी ऑफर म्हणजेच OFS आणि नवीन शेअर्स दोन्ही जारी करू शकते. टाटा समूहाचे संस्थापक शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर देऊ शकतात. टाटा मोटर्सचे टाटा टेक्नॉलॉजीसमध्ये भागभांडवल ७२.४८ टक्के आहे. तर, सिंगापूरची कंपनी अल्फा टीसीची या कंपनीत ८.९६ टक्के हिस्सेदारी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार TATA ची ही कंपनी इक्विटी ऑफरद्वारे किमान १० टक्के भाग विकण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ईटी नाऊने वृत्त दिले आहे.

TATA Tech प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगिक यंत्रसामग्री आणि उद्योग क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. तर कंपनीचे मुख्यालय पुण्यात असून जगभरात १८ वितरक केंद्रे आहेत. त्याच वेळी, त्यात ९,३०० कर्मचारी आहेत.

TATA Tech ही समूहाची एक नफ्यात असलेली कंपनी आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा टेकचा महसूल ३५२९.६ कोटी रुपये होता. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये सुमारे ७२ टक्के इक्विटी स्टेक असलेली टाटा मोटर्स ही सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे.

उर्वरित बहुतेक इक्विटी TATA समूहाच्या इतर घटक आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, मिझुहो सिक्युरिटीज द्वारे समर्थित सिंगापूर-निवासी गुंतवणूक फर्मच्या मालकीची आहे.