Air India सोपवण्यासाठी TATA Group हा एक उत्तम पर्याय : मॉन्टेक सिंग अहलूवालीया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:45 AM2021-10-08T11:45:40+5:302021-10-08T11:56:10+5:30

Air India, Tata Group : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह हा उत्तम पर्याय असल्याचं पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशनच्या माजी उपाध्यक्षांचं मत.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह हा उत्तम पर्याय असल्याचं मत पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशनचे माजी उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलूवालीया यांनी व्यक्त केलं. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूहापेक्षा उत्तम स्थिती भारतात अन्य कोणत्याही कॉर्पोरेटची नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एअर इंडियासाठी यापूर्वी केंद्र सरकारनं बोली मागवली होती. यामध्ये टाटानं सर्वाधिक रकमेची बोली लावल्याची माहिती समोर आली होती. परंतु ही बोली गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीकडून मंजुरी मिळणं बाकी असल्याचंही सांगण्यात येत आहे.

व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अहलूवालीया यांनी यावर भाष्य केलं. "तुमच्याकडे टाटा समुहाशिवाय उत्तम कॉर्पोरेट असू शकत नाही. आम्ही हे (सरकारी एअरलाईन्स एअर इंडिया) त्यांच्याकडे सोपवू शकतो," असं ते म्हणाले.

एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (AISAM) नामक पॅनलच्या अन्य सदस्यांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

योग्य स्थितीतील एअर इंडिया ही संपूर्ण देशासाठी योग्य आहे आणि याच्या खासगीकरणानंतर हा ब्रांड आपली जुना अभिमान पुन्हा मिळवेळ, अशी प्रतिक्रिया स्पाईसजेटचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली.

आपण आपल्या व्यक्तीगत क्षमतेनं एअर इंडियासाठी बोली लावली. सरकारसोबत गोपनीयतेच्या अटीवर या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे यावर आपण भाष्य करू शकत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

यापूर्वी एअर इंडियासाठी टाटा समुहाची निवड झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु सरकारनं याचं खंडन केलं. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितलं की, एअर इंडियाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच, एअर इंडियाच्या बोलीतील विजेत्याची निवड निश्चित प्रक्रियेद्वारे केली जाईल.

"माझ्या मते असा कोणताही निर्णय (एअर इंडियासंदर्भात) सरकारने घेतला नाही. साहजिकच यासाठी निविदा मागवण्यात आल्या आणि आमचे अधिकारी त्याचे मूल्यांकन करत आहेत. याची एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यानंतर एअर इंडिया बोलीच्या विजेत्याचं नाव योग्य वेळी जाहीर केलं जाईल," असं गोयल म्हणाले होते.

कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार टाटा सन्सने एअर इंडियावर लावण्यात आलेली बोली जिंकल्याचे समोर आले होते, मात्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाची देखरेख करणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने हे वृत्त फेटाळले होते. डीआयपीएएम (DIPAM)विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी शुक्रवारीच एअर इंडिया संदर्भातील अहवाल फेटाळला होता. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील (Air India) ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारने कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा (financial bids) दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे (TATA Group) आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती.

सरकारने एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसेच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचे पत्र दिले होते.

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा (financial bids) दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे (TATA Group) आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती.

सरकारने एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसेच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचे पत्र दिले होते.

Read in English