टाटा कंपनीला ₹850 कोटी रुपयांचा प्रॉफिट, शेअरनं घेतला रॉकेट स्पीड; 1 लाखचे झाले 2.19 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:56 PM2023-07-17T20:56:40+5:302023-07-17T20:59:22+5:30

या तिमाहीदरम्यान झालेल्या ऑपरेशन्समधून कंपनीच्या महसुलात 17 टक्यांची वाढ झाली असून तो 850 कोटींवर पोहोचला आहे.

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा एलेक्सीने (Tata Elxsi) जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत Tata Elxsi चा निव्वळ नफा 2 टक्क्यांनी वाढून 189 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो 185 कोटी रुपये एवढा होता.

या तिमाहीदरम्यान झालेल्या ऑपरेशन्समधून कंपनीच्या महसुलात 17 टक्यांची वाढ झाली असून तो 850 कोटींवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीचा महसून 726 रुपये एवढा होता. करपूर्व नफा (PBT) समीक्षाधीन कालावधीत वार्षिक 9 टक्क्यांनी वाढून 248 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

विभागवार, औद्योगिक डिझाइन आणि व्हिज्युअलायझेशन विभागाने कॉन्सटेंट करन्सी टर्ममध्ये 41 टक्के एवढी जबरदस्त वार्षिक वृद्धी नोंदवली आहे.

कंपनीने म्हटले आहे, त्यांची डिझाइन-डिजिटल ऑफर आव्हानात्मक जागतिक बाजारपेठेतील वातावरणात व्हॉल्यूम-बेस्ड विकासला प्रोत्साहन देत आहे. टाटा एलेक्सीने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला सांगितले की,'परिवहन सेगमेंटमध्ये सातत्याने चांगली वृद्धी दसत आहे. कॉन्सटेंट करन्सी टर्ममध्ये 17 टक्क्यांची महसूल वाढ नोंदवली जात आहे. तसेच, सॉफ्टवेअर डिफाइंड व्हेइकल (SDV) आणि इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये (EV) एक चांगली डील पाइपलाइन आहे.'

व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कंपनीची कमाई, गेल्या आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत ₹221 कोटींवरून 4.1 टक्क्यांनी वाढून ₹230 कोटी झाली आहे. याच बरोबर, हिचे ऑपरेटिंग मार्जिन Q1FY23 मध्ये 30.5 टक्क्यांनी कमी होऊन Q1FY24 मध्ये 27.1 टक्क्यांवर आले आहे. तिमाहीतील कंपनीचे EBITDA मार्जिन 29.6 टक्के एवढे होते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)