Post Office च्या या स्कीमवर मिळतंय सर्वाधिक व्याज; मुलींचं भविष्य करू शकता सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 01:16 PM2021-11-28T13:16:21+5:302021-11-28T13:24:51+5:30

Post Office च्या SSY या योजनेत सर्वाधिक व्याज देण्यात येतंय. पाहूया या योजनेत काय मिळतायत बेनिफिट्स.

Sukanya Samridhi Yojana: जर तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये गुंतवणूक करू शकताय या योजनांमध्ये बँकेच्या तुलनेत उत्तम परतावा मिळतो.

यासोबतच तुमचे पैसेही सुरक्षित राहतात. याशिवाय बँकेत गुंतवणूक केली असेल आणि बँक दिवाळखोरीत गेली तर ५ लाखांची रक्कम मिळते. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केलेल्या संपूर्ण पैशांवर सरकारची सॉवरेन गॅरंटी आहे.

आजही भारतात मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नावर आई-वडिल अधिक खर्च करताना दिसतात. म्हणून बहुतांश पालकांचा कल हा अशा गुंतवणूकीत असतो ज्यातून अधिक परतावा मिळेल. केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना मुलींच्या भविष्याकडे पाहून सुरू करण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिसच्या या स्किममध्ये वार्षिक ७.६ टक्क्यांचं व्याज देण्यात येतं. हे व्याजदर १ एप्रिलपासून लागू आहे. हे व्याज वार्षिक आधारावर कॅल्क्युलेट आणि कंपाऊंड केलं जातं.

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एका आर्थिक वर्षात किमान २५० रूपये आणि कमाल १.५ लाख रूपयांची गुंतवणूक केली जाऊ शकतं. यानंतर ५० रूपयांच्या मल्टिपलमध्ये गुंतवणूक करावी लागते. तसंच तुम्ही एकरकमी गुंतवणूकही करू शकता.

या योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावे खातं उघडलं जाऊ शकतं. एका मुलीच्या नावे पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेतएक खातं उघडता येतं. एका कुटुंबातील जास्तीतजास्त दोन मुलींसाठी हे खातं उघडता येतं. जुळ्या मुली असतील तर अशा प्रकरणात जुळ्या मुली आणि तिळ्यांच्या प्रकरणात दोन पेक्षा अधिक खाती उघडता येतात.

पोस्ट ऑफिसमध्ये हे अकाऊंट उघडल्यास ते अकाऊंट सुरू केल्याच्या तारखेपासून २१ वर्षानंतर ते बंद करता येतं. याशिवाय मुलीचं वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळी हे खातं बंद करता येतं.

सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांची आहे. परंतु या पालकांना केवळ १४ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर एका आर्थिक वर्षांत २५० रूपये जमा केले जात नाही, तर तो अकाऊंट डिफॉल्ट मानला जातो.

डिफॉल्ट खातं हे खातं उघडण्याच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ठीक केलं जाऊ शकतं. यासाठी त्या व्यक्तीला प्रत्येक वर्षासाठी ५० रूपयांसह २५० रूपये जमा करावे लागतील. अकाऊंटमध्ये जमा रकमेवर इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत डिडक्शनचा फायदाही मिळतो.