शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुकन्या समृद्धी योजना Vs. PPF : पाहा कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल अधिक रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 6:52 PM

1 / 12
आजही भारतात मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नावर आई-वडिल अधिक खर्च करताना दिसतात. म्हणून बहुतांश पालकांचा कल हा अशा गुंतवणूकीत असतो ज्यातून अधिक परतावा मिळेल.
2 / 12
केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना मुलींच्या भविष्याकडे पाहून सुरू करण्यात आली आहे.
3 / 12
तर पाहूया पब्लिक प्रोविडेंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना यातील सर्वाधिक फायद्याची कोणती स्कीम आहे.
4 / 12
काही जाणकारांच्या मते सुकन्या समृद्धी योजनेत सर्वच पैसा गुंतवणं योग्य ठरणार नाही. तर त्यातील काही पैसा हा पीपीएफ मध्येही गुंतवला पाहिजे.
5 / 12
सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला ७.६ टक्क्यांचं व्याज मिळतं. तर पीपीएफवर ७.१ टक्क्याचं व्याज मिळतं.
6 / 12
हे व्याज दर चार महिन्यांनी रिवाईज केलं जातं. जेव्हा पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजना यापैकी कोणतीही एखादी योजना निवडायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना निवडू शकता.
7 / 12
कारण पीपीएफच्या तुलनेत यात अधिक परतावा मिळतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता तर त्यातून तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो. त्यामुळे थोडी थोडी गुंतवणूक दोन्ही योजनांमध्ये करणं उत्तम आहे.
8 / 12
पीपीएफमधील गुंतवणूक सर्वांच्याच पसंतीची आहे कारण यात तुम्हाला सरकारी गॅरंटी मिळते. यात करावरही सूट मिळते.
9 / 12
आयकर अधिनियमच्या कलम ३७० सी अंतर्गत तुम्हाला दीड लाखआंपर्यंत गुंतवणूकीवर सूट मिळते. दोन्ही योजना या टपाल खात्याकडून चालवल्या जातात.
10 / 12
याव्यतिरिक्त ज्या बँकेमध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असतो त्या बँकेत तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्याचाही पर्याय मिळतो.
11 / 12
पीपीएफ अकाऊंटची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते. परंतु ती पाच-पाच वर्षांनी वाढवली जाऊ शकते. तर दुसरीकडे सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांची आहे. परंतु या पालकांना केवळ १४ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.
12 / 12
या योजनेमध्ये वर्षाला कमीतकमी २५० रूपये आणि जास्तीतजास्त दीड लाख रूपये गुंतवता येतात. तर पीपीएफमध्ये वर्षाला कमीतकमी ५०० रूपये आणि जास्तीतजास्त दीड लाख रूपये गुंतवता येतात.
टॅग्स :PPFपीपीएफMONEYपैसाInvestmentगुंतवणूकPost Officeपोस्ट ऑफिसIndiaभारतGovernmentसरकार