शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 22:23 IST2025-09-13T22:16:49+5:302025-09-13T22:23:22+5:30

पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1054.95 रुपये आहे. तर, 52 आठवड्याचा निचांक 471.15 रुपये एवढा आहे.

पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांन मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये ११००० टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली.

पाच वर्षांपूर्वी पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवून, ती गुंतवणूक आतापर्यांत ठेवणारे करोडपती झाले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी पाच वर्षात १ लाख रुपयांचे १ कोटीहून अधिक केले आहेत.

पीजी इलेक्ट्रोप्लास्ट ही एक आघाडीची इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस (ईएमएस) कंपनी आहे. पीजी इलेक्ट्रोप्लास्ट एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी टेलिव्हिजन, एअर कूलर आणि प्लास्टिक कंपोनंट्स बनवते.

1 लाखाचे केले 1 कोटी - पीजी इलेक्ट्रोप्लास्टचा शेअर 4 सप्टेंबर 2020 रोजी 5 रुपयांवर होता. तो 12 सप्टेंबर 2025 रोजी BSE वर 570.05 रुपयांवर बंद झाला. साधारणपणे गेल्या 5 वर्षांत या शेअरमध्ये 11265 पर्सेंटहून अधिकची तेजी आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 4 सप्टेंबर 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता तिची मूल्य 1.14 कोटी रुपये झाले असते.

4 वर्षांत दिला 1490% हून अधिकचा परतावा - पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडचा शेअर गेल्या चार वर्षांत 1490 टक्क्यांनी वधारला आहे. हा 9 सप्टेंबर 2021 रोजी 35.65 रुपयांवर होता. जो 12 सप्टेंबर 2025 रोजी BSE वर 570.05 रुपयांवर बंद झाला आहे.

गेल्या तीन वर्षांचा विचार करता, हा शेअर 453 टक्क्यांनी वधारला. तर दोन वर्षांत या शेअरने 213 टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात कंपनीचा शेअर जवळपास 8 टक्क्यांनी घसरला आहे.

पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1054.95 रुपये आहे. तर, 52 आठवड्याचा निचांक 471.15 रुपये एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)