पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:29 IST2025-07-09T19:00:29+5:302025-07-09T19:29:35+5:30

बुधवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान एमआरएफच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांहून अधिकने वधारून बीएसईवर १५१५५२.३० रुपयांवर पोहोचला आहे.

टायर कंपनी एमआरएफ लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. बुधवारी एमआरएफच्या शेअरने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा १५०००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

बुधवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान एमआरएफच्या शेअरची किंमत ४ टक्क्यांहून अधिकने वधारून बीएसईवर १५१५५२.३० रुपयांवर पोहोचला आहे.

ट्रेडिंगच्या शेवटी, कंपनीचा शेअर बीएसईवर ४.११ टक्क्यांच्या वाढीसह १५०८७९.३० रुपयांवर बंद झाला. बुधवारी एमआरएफचा शेअर ५९५६.४० रुपयांची वाधारला आहे.

४ महिन्यात ४४००० रुपयांहूनही अधिक वधारला शेअर - गेल्या चार महिन्यांत टायर कंपनी एमआरएफचा शेअर सुमारे ४२ टक्क्यांनी वधारला. अर्थात या कालावधीत या शेअरमध्ये ४४३२२ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या १० मार्च २०२५ रोजी कंपनीचा शेअर १०६५५७ रुपयांवर होते. तो ९ जुलै २०२५ रोजी १५०८७९.३० रुपयांवर बंद झाला.

गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर सुमारे ९ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक १००५०० रुपये आहे. बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी एमआरएफचे मार्केट कॅप ६३,९९० कोटी रुपयांवर पोहोचले.

५ वर्षांत १३३% चा दिलाय परतावा - एमआरएफचा सेअर गेल्या पाच वर्षंत १३३ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर १० जुलै २०२० रोजी ६४,८३०.५० रुपयांवर होता. तो ९ जुलै २०२५ रोजी १५०८७९.३० रुपयांवर बंद झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ७५,००० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांचा विचार करता, एमआरएफच्या शेअर्समध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीत प्रवर्तकांचा वाटा २७.७८ टक्के एवढा आहे. तर, सार्वजनिक वाटा ७२.२२ टक्के एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)