Best Stocks to Buy : हे 5 शेअर एका वर्षात करून देतील ढासू कमाई, गुंतवणूकदारांना मिळेल बम्पर परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:19 PM2022-11-07T16:19:48+5:302022-11-07T16:27:04+5:30

सप्टेंबर महिन्याअखेरीस संपलेल्या तिमाहीचे आकडे कंपन्यांकडून जारी केले जात आहेत. अशात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून, क्वालिटी स्टॉक्समधून पैसे कमवण्याची संधी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेड र‍िझर्व्हकडून व्याज दर वाढविण्यात आल्यानंतर, जगभरातील शेअर बाजारात दबाव दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात बाजारात झालेल्या उलथापालथीनंतर सोमवारी सुरू झालेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाजारात घसरण दिसून आली. सोमवारीही सेंसेक्‍स आणि निफ्टी दोन्हींतही घसरण झाल्याचे दिसत आहे.

सप्टेंबर महिन्याअखेरीस संपलेल्या तिमाहीचे आकडे कंपन्यांकडून जारी केले जात आहेत. अशात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून, क्वालिटी स्टॉक्समधून पैसे कमवण्याची संधी आहे. ब्रोकरेज हाऊसेसनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेऊन काही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या सल्ला दिला आहे. एका बिझनेस चैनलने 5 स्‍टॉक्‍ससंदर्भात त्यांचे मत घेतले आहे. या 5 स्‍टॉक्‍सवर पुढील 12 महिन्यांत 49 टक्क्यांपर्यंत तगडा परतावा म‍िळण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्म Nuvama Wealth ने HPCL चा स्‍टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राइस 302 रुपये एवढी आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरचा भाव 203 रुपये होता. अशा प्रकारे, येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 99 रुपये अथवा जवळपास 49 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

Nuvama Wealth नेच Macrotech Developers चे स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राइस 1,395 रुपये एवढी आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरची किंमत 952 रुपये एवढी होती. अशा प्रकारे, येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांना एका शेअरवर 443 रुपये अथवा 46 टक्के परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्म Anandrathi ने Kansai Nerolac च्या शेअरवर पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टारगेट प्राइस 610 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शअर 448 रुपयांवर बंद झाला होता. अशा प्रकारे येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 162 रुपये अथवा 36 टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, Dalmia Bharat चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्लाही Anandrathi ने दिला आहे. हा शेअर 4 नोव्हेंबरला 1,742 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरची टार्गेट प्राइस 2160 रुपये आहे. अशा प्रकारे आता गुंतवणूक करणाऱ्यांना प्रति शेअर 418 रुपये अथवा 24 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप - येथे स्‍टॉक्‍समधील गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)