शेअर मार्केट आपटला; टाटा-अंबानींसह 'या' कंपन्यांना मोठा फटका, 17 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:48 PM2023-10-26T15:48:06+5:302023-10-26T16:14:09+5:30

आज सलह सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेंसेक्स 812.94 अंकांनी तर निफ्टी 237.60 अंकांनी खाली.

Share Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या वादळात केवळ लहान किंवा मध्यम स्टॉकच नाही, तर हेवीवेट स्टॉक्सही कोसळले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात बाजारातील टॉप स्टॉक्सपैकी एक असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. परिस्थिती अशी आहे की, दोन तासांच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 4.73 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या दोन आठवड्यात 17 लाख कोटींहून अधिक रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

आज सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला आहे, निफ्टीमध्ये 250 अंकांची घसरण पाहायला मिळत आहे. सलग 6 व्या दिवशी बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आकडेवारीनुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 812.94 अंकांच्या घसरणीसह 63,236.12 अंकांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 237.60 अंकांच्या घसरणीसह 18,884.5 अंकांवर व्यवहार करत आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे शेअर 11 ऑक्टोबरपासून 5 टक्क्यांनी घसरले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 2345 रुपये होता, जो आज दिवसाच्या 2227.90 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. या काळात रिलायन्सचे मार्केट कॅप 79,226.13 कोटी रुपयांनी घसरले आहे.

TCS च्या शेअर्समध्ये दोन आठवड्यांत 7.72 टक्क्यांची घसरण झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 3,610.20 रुपये होता, जो आज दिवसाच्या 3,331.35 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. या काळात TCS च्या मार्केट कॅपला 1,02,115.12 कोटी रुपयांचा तोटा झाला.

11 ऑक्टोबरपासून HDFC बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.07 टक्क्यांची घसरण झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 1538.60 रुपये होता, जो आज 1460.55 रुपयांच्या खालच्या पातळीवर आला. या कालावधीत 59,160 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ICICI बँकेचे शेअर्स 11 ऑक्टोबरपासून 5.57 टक्क्यांनी घसरले आहेत. त्या दिवशी बँकेचा शेअर 952.65 रुपये होता, जो आज 899.55 रुपयांवर आला आहे. या दोन आठवड्यात बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 37,666.28 कोटी रुपयांची घट झाली आहे.

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये दोन आठवड्यात 9.35 टक्क्यांची घसरण झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 1493.65 रुपये होता जो 1353.85 रुपयांवर आला. या कालावधीत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 58,073.40 कोटी रुपयांची घट झाली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये दोन आठवड्यात 3.94 टक्क्यांची घसरण झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 2555.95 रुपयांवर होता, जो आज 2455.05 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या कालावधीत HUL चे मार्केट कॅप 23,707.37 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

भारती एअरटेलच्या शेअर्सना दोन आठवड्यात 5.39 टक्क्यांनी तोटा झाला आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 955.45 रुपये होता, जो आज दिवसाच्या 903.95 रुपयांच्या खालच्या पातळीवर आला. या कालावधीत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 28,929.37 कोटी रुपयांची घट झाली आहे.

एसबीआयच्या शेअर्समध्ये दोन आठवड्यात 7.67 टक्क्यांची घसरण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी कंपनीचा शेअर 588.30 रुपयांवर होता, जो दिवसाच्या 543.15 रुपयांच्या खालच्या पातळीवर आला आहे. या कालावधीत कंपनीला 40,294.62 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये दोन आठवड्यात 8.37 टक्क्यांची घसरण झाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी कंपनीचा शेअर 8098.40 रुपयांवर होता, जो आज 7420 रुपयांवर आला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सना 41,105.55 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.