Rakesh Jhujhunwala Stock Market : राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील शेअरची जबरदस्त रिकव्हरी, घेतली मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 03:52 PM2022-06-06T15:52:27+5:302022-06-06T15:56:11+5:30

Rakesh Jhujhunwala Stock Market : गेल्या काही दिवसांमध्ये या शेअरची किंमत ३ टक्क्यांनी, तर ६ महिन्यांत या शेअरची किंमत १८ टक्क्यांनी पडली होती.

शेअर बाजाराचे (Stock Markt) बिग बुल (Big Bull) म्हटल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत चांगलीच रिकव्हरी केली आहे. 223.65 रुपयांच्या या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच सत्रांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

या दरम्यान, Va Tech Wabage चा शेअर 223.65 रुपयांवरून 259.35 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कंपनीचा शेअर यानंतरही वाढू शकतो. कंपनीला मिळालेल्या नव्या ऑर्डरमुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या स्पर्धेदरम्यान सेनेगलच्या या ऑर्डरमुळे आम्हाला आनंद झाला आहे. कंपनी सातत्यानं नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज सक्सेना यांनी दिली.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर गेल्या सहा महिन्यांबाबत सांगायचं झालं तर या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांनी खाली आली.

एका वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्क्यांनी कमी झाली. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या आठवडाभराच्या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये रिकव्हरी दिसून आली आहे.

आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरच्या तिमाहीवर नजर टाकल्यास कंपनीमध्ये बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक आहे. या कालावधीत त्यांच्याकडे 50 लाख शेअर्स अथवा 8.04 टक्के हिस्सा होता.