By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 21:36 IST
1 / 8Big Bull Rakesh Jhunjhunwala net worth: गेल्या एका महिन्यात बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांची एकूण संपत्ती 832 कोटी रुपयांनी वाढली आहे. संपत्ती वाढण्याचे कारण म्हणजे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले दोन स्टॉक (Rakesh jhunjhun portfolio stocks). 2 / 8स्टार हेल्थ (Star health) आणि मेट्रो ब्रँड्स (Metro brands) नावाचे हे दोन स्टॉक्स आहेत. या स्टॉक्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपयांपर्यंत वाढली आहे. 3 / 8त्याचप्रमाणे, मेट्रो ब्रँडचा शेअर गेल्या एका महिन्यात 531.95 रुपयांवरून 604 रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. या शेअरच्या किंमतीत सुमारे 72.05 रुपये प्रति शेअरची वाढ झाली आहे.4 / 8बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची स्टार हेल्थ कंपनीत भागीदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स आहेत. तसंच ते कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या सुमारे 17.50 टक्के आहे.5 / 8ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीसाठी मेट्रो ब्रँड्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यामार्फत या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी निष्ठा झुनझुनवाला ट्रस्ट, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट आणि आर्यमन झुनझुनवाला ट्रस्ट या तीन ट्रस्टच्या माध्यमातून या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.6 / 8निष्ठा झुनझुनवाला ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडमध्ये 1,30,51,188 शेअर्स अथवा 4.81 टक्के हिस्सा आहे. आर्यवीर झुनझुनवाला ट्रस्ट आणि आर्यमन झुनझुनवाला ट्रस्टचे विश्वस्त म्हणून, त्यांच्याकडे दोन्ही ट्रस्टमध्ये अनुक्रमे 1,30,51,206 शेअर्स किंवा 4.81 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्समध्ये 3,91,53,600 शेअर्स आहेत, जे फुटवेअर कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 14.43 टक्के आहे.7 / 8स्टार हेल्थच्या शेअर्सची किंमत 54.50 रुपयांनी वाढली आहे आणि राकेश झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थचे 10,07,53,935 शेअर्स आहेत. गेल्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाच्या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीतील नेट प्रॉफिट सुमारे 550 कोटी रुपयांनी (54.50 x10,07,53,935) वाढलं आहे.8 / 8त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडचे 3,91,53,600 शेअर्स आहेत आणि राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक गेल्या एका महिन्यात 72.05 रुपये प्रति शेअरने वाढला आहे. गेल्या एका महिन्यात या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीत नेट प्रॉफिट जवळपास 282 कोटी (72.05 x 3,91,53,600) झालं आहे. या तेजीनंतर एकामहिन्यात झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एकूण 832 कोटी रुपयांची वाढ झाली.