ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 20:10 IST2025-10-05T20:04:56+5:302025-10-05T20:10:39+5:30

निर्यातीत 7.8% वाढ... निर्यातीत झालेली ही वाढ कंपनीसाठी सकारात्मक...

ऑटो क्षेत्रातील फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीने 5 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या एकूण 2,610 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात 2,564 युनिट्सची विक्री झाली होती. आर्थात या वर्षात विक्रीत 1.79 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

निर्यातीत 7.8% वाढ - फोर्स मोटर्सने दिलेल्या महीतीनुसार, सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात 2,486 युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, 124 युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या 115 युनिट्सच्या तुलनेत, 7.8 टक्क्यांनी अधिक आहे. निर्यातीत झालेली ही वाढ कंपनीसाठी सकारात्मक आहे.

ताज्या आकडेवारीत काहीशी सुस्ती दिसत असली तरी, 22 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी दरांमुळे ऑटो कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. आगामी दिवाळीच्या अथवा सणासुदीच्या हंगामात कंपन्यांना विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

जून तिमाहीतील कामगिरी जून तिमाहीत फोर्स मोटर्सचा निव्वळ नफा 176.30 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 115.70 कोटी रुपयांच्या तुलनेत 52.30 टक्क्यांनी अधिक आहे. ही वाढ कंपनीची मजबूत कामगिरी दर्शवते.

शेअर्सनी दिला जबरदस्त परतावा - शुक्रवारी बाजार बंद होताना फोर्स मोटर्सच्या शेअर्सची किंमत 16,794.50 रुपये एवढी होती. 2025 मध्ये कंपनीने 153 टक्के परतावा दिला, तर गेल्या एका वर्षात शेअर्सच्या किमतीत 128 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, गेल्या पाच वर्षांत फोर्स मोटर्सचा शेअर तब्बल 1,471 टक्क्यांनी वधारला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कंपनीबद्दल उत्साह दिसत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)