Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
By जयदीप दाभोळकर | Updated: November 1, 2025 09:40 IST2025-11-01T09:17:58+5:302025-11-01T09:40:32+5:30
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यावर चांगला परतावादेखील मिळावा असं वाटतं. खासकरून घरातील महिलांसाठी बचत आणि गुंतवणूक भविष्यातील सुरक्षेच्या रूपात पाहिली जाते.

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यावर चांगला परतावादेखील मिळावा असं वाटतं. खासकरून घरातील महिलांसाठी बचत आणि गुंतवणूक भविष्यातील सुरक्षेच्या रूपात पाहिली जाते.

तर, जर तुम्ही देखील तुमच्या पत्नीच्या नावावर एक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक योजना (Investment Scheme) शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग्स रेकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office RD Scheme) तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. वास्तविक, ही योजना पूर्णपणे भारत सरकारद्वारे चालवली जाते, त्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा धोका खूप कमी आहे आणि परतावा देखील निश्चित आहे.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा करता. या योजनेची मुदत ५ वर्षांची असते आणि यावर ६.७% वार्षिक व्याज दिलं जातं. ही योजना तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर देखील उघडू शकता, ज्यामुळे तिला तिच्या नावाने बचत आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकेल.

आपण असं गृहीत धरूया की, तुम्ही या स्कीममध्ये तुमच्या पत्नीच्या नावावर दरमहा ₹८,००० जमा करता. यानुसार, ५ वर्षांच्या (६० महिने) एकूण कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ₹८,०००*६० म्हणजे ₹४,८०,००० होईल. ६.७% व्याजानुसार, यावर सुमारे ₹९०,९२९ (अंदाजे) इतकं व्याज मिळेल. त्यामुळे, मॅच्युरिटीवर तुमच्या पत्नीला एकूण रक्कम ₹५,७०,९२९ मिळतील. हे रिटर्न कोणत्याही बाजार जोखमीशिवाय आणि फंड मूल्याच्या चढ-उताराशिवाय मिळतं, जे याला कौटुंबिक बचतीसाठी उत्तम पर्याय बनवते.

पत्नीच्या नावावर हे खातं उघडल्याने वेगळी आर्थिक सुरक्षा तयार होते आणि ती सेल्फ डेपेंडेंट आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक बनण्यास मदत होते. हे खातं नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणी, अशा दोन्ही महिलांसाठी सर्वोत्तम मानलं जातं. या सरकारी योजनेत कोणताही धोका नाही, शिवाय कलम ८० सी अंतर्गत कर बचतीचाही फायदा घेतला जाऊ शकतो.

खातं उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. आपल्या पत्नीचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणे आवश्यक आहे (नसल्यास, ते तिथेच उघडता येतं). आरडी खातं उघडण्यासाठी फॉर्म भरून पहिली हप्ता जमा केल्यास खातं सक्रिय होतं. तुम्ही हवे असल्यास, हे अकाउंट ऑटो-डेबिट देखील करू शकता, जेणेकरून दर महिन्याला पैसे आपोआप जमा होत राहतील.

नोकरी करणारे लोक ज्यांना मासिक उत्पन्नाची स्थिरता हवी आहे, सुरक्षित परतावा शोधणारे कुटुंब आणि निवृत्तीचं नियोजन किंवा भविष्यातील लक्ष्य ठरवणारे, तसंच नवीन विवाहित जोडप्यांसाठी देखील ही एक आदर्श योजना आहे.

जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एक मजबूत आणि सुरक्षित फंड तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची ही आरडी स्कीम एक विश्नासाची आणि चांगला पर्याय आहे. दरमहा केवळ ₹८,००० सारखी छोटी गुंतवणूक देखील ५ वर्षांनंतर ₹५,७०,९२९ सारखा मोठा आणि निश्चित फंड बनू शकतो. म्हणजेच, छोट्या-छोट्या बचतीनंही भविष्य सुरक्षित करता येतं.

















