सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:16 IST
1 / 9Gold-Silver Price : गेल्या काही वर्षातील आकडेवारी जर पाहिली तर चांदीने प्रगतीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकलं आहे. आणि पुढेही अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.2 / 9चांदी ही केवळ दागिन्यांची वस्तू राहिली नसून, ती आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी एक अपरिहार्य धातू बनली आहे. एक इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी २९ ते ५० ग्रॅम चांदी लागते, जी साध्या कारच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी चांदीची मागणी वाढवत आहे.3 / 9प्रत्येक सोलर पॅनल बनवण्यासाठी साधारणतः १५ ते २० ग्रॅम चांदी लागते. जगभरात सोलर एनर्जी प्लांट्स झपाट्याने उभे राहत असल्याने चांदीची मागणी तुफान वाढली आहे. AI, रोबोट्स आणि डेटा सेंटर्स चालवणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या चिप्समध्ये चांदी वापरली जाते. तंत्रज्ञान जसजसे वाढतेय, तशी चांदीची गरजही प्रचंड वाढत आहे.4 / 9चांदी हा विजेचा सर्वात उत्तम वाहक धातू आहे. ती चिप्स, फ्यूज आणि ५G टॉवर्समध्ये वापरली जाते. चांदीची जागा दुसरा कोणताही धातू घेऊ शकत नाही. फ्यूचर बॅटरी आणि हायड्रोजन फ्यूएल सेल्समध्येही चांदीचा वापर वाढत आहे. यामुळे भविष्यात चांदीच्या मागणीची मोठी कारणे तयार होत आहेत.5 / 9विजेचे वहन करण्यासाठी चांदीशिवाय दुसरा कोणताही प्रभावी धातू नसल्यामुळे, किंमत कितीही वाढली तरी कारखान्यांना चांदीशिवाय पर्याय नाही.6 / 9वाढत्या किंमतीमुळे सोन्यापाठोपाठ काही मोठ्या बँका भविष्यासाठी चांदीचा साठा तयार करत आहेत. सोनं खूप महाग झाल्यामुळे लोक आता छोटी चांदीची नाणी आणि ETF मध्ये गुंतवणूक करत आहेत. चीन, रशिया आणि ब्रिक्ससारखे देश आता अमेरिकन डॉलर सोडून जास्त सोने आणि चांदी खरेदी करत आहेत, ज्यामुळे जागतिक पातळीवर चांदीचे महत्त्व वाढत आहे.7 / 9भारतात पुन्हा चांदीच्या नाण्यांना मागणी वाढत आहे. तसेच काही क्रिप्टो प्रोजेक्ट्स चांदीवर आधारित डिजिटल टोकन्स तयार करत आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांदी चांगला पर्याय ठरू शकते.8 / 9चांदी बहुतांशी तांबे किंवा जस्ताच्या खाणींमधून बाय-प्रॉडक्ट म्हणून मिळते. त्यामुळे मागणी वाढली तरी तिचा पुरवठा त्या वेगाने वाढू शकत नाही. मोठ्या बँका आणि COMEX सारख्या व्हॉल्ट्समधील चांदीचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. सध्या फक्त २ वर्षांचाच चांदीचा साठा शिल्लक राहिला आहे, याचा परिणाम भविष्यात किमतीवर होऊ शकतो.9 / 9चांदीचा वापर दागिन्यांसोबतच मशिन, स्मार्टफोन आणि अगदी औषधांपर्यंत सगळीकडे केला जातो. चांदी जंतू मारण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये तिचा वापर ड्रेसिंग, औषध आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये होतो. या सर्व कारणांमुळे चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि भविष्यात तिच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.