याला म्हणतात 'धाकड' शेअर...! केवळ 6 महिन्यांत दाखवली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:12 PM2023-08-14T17:12:12+5:302023-08-14T17:20:51+5:30

आजच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे.

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मालामाल केले आहे, मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज असाच एक शेअर बाजार मल्टीबॅगर परतावा देत आहे. एवढेच नाही, तर आजच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे.

या शेअरचे नाव आहे, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड. आज सलग दुसऱ्या सत्रात या कंपनीचा शेअर वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीने केवळ YTD काळात आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.

जानेवारीपासून ते आतापर्यंत या स्टॉकने तब्बल 59.50 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील विक्रमी उच्चांक 519.00 रुपये एवढा आहे. तर निचांक 174.10 रुपये एवढा आहे.

एका महिन्यात 24 टक्क्यांनी वाढला शेअर - किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा शेअर अजही ४.१४ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कालावधीत या शेअरने 14.21 टक्क्यांची वाढ झाली. तसेच एका महिन्यात 24.37 टक्क्यांची वाढ झाली. अर्थात 98.25 रुपयांपर्यंत वाढ झाली.

6 महिन्यांत 60 टक्क्यांचा परतावा - गेल्या 6 महिन्यांचा चार्ट पाहिल्यास, हा शेअर 60.42 टक्क्यांनी वधारला आहे. अर्थात 188.85 रुपयांनी वधारला आहे. 14 फेब्रुवारीला कंपनीचा शेअर 312 रुपयांच्या पातळीवर होता. तो आज 500 रुपयांवर व्यवहार करत आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय? - किर्लोस्कर ऑइलच्या व्यवसायासंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनी इंजिन, कृषी उपकरणे आणि जनरेटर सेट तयार करण्याच्या व्यवसायात आहे. याशिवाय कंपनी डिझेल इंजिनही तयार करते. याशिवाय, डिझेल जनरेटर सेटसाठी एअर-कूल्ड आणि लिक्विड-कूल्ड इंजिन देखील तयार कते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)