5 द‍िवसांत 4 पेनी स्टॉक्सची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला छप्परफाड परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:57 PM2023-12-23T17:57:48+5:302023-12-23T18:05:16+5:30

जाणून घ्या, या पाच दिवसांत कोण-कोणत्या पेनी स्टॉक्सनं आपल्या गुंतवणूकदारांना केलं मालामाल...

शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती दिसत असतानाच गेल्या आठवड्यात काही पेनी स्‍टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला पैसा कमावून दिला आहे. तर जाणून घेऊयात या पाच दिवसांत कोण- कोणत्या पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना केलं मालामाल.

स्मार्ट फिनसेकचा मायक्रो-कॅप स्टॉक - हा शेअर दलाल स्ट्रीटवरील एक्स कॅटेगिरीमध्ये लिस्टेड आहे. हा पेनी स्टॉक बीएसईवर 17.67 रुपयांवर बंद झाला झाला. एक आठवड्यापूर्वीच्या 10.99 रुपये प्रति शेअरच्या तुलनेत या शेअरमध्ये 60 टक्क्यांची वृद्धि दिसून आली आहे. या तेजी बरोबरच हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचाला आहे.

रेनबो फाउंडेशनचा पेनी स्टॉक - हा स्टॉक दलाल स्ट्रीटवर एक्स कॅटेगिरीमध्ये ल‍िस्‍टेड आहे. हा शेअर शुक्रवारी बीएसईवर 16.89 रुपयांवर पोहोचला. गेल्या शुक्रवारी हा शेअर 12.01 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या शेअरमध्ये जवळपास 40 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. याच बरोबर या सॉकने 52 आठवड्यांतील 17.05 रुपयांच्या उच्चांकालाही स्पर्श केला.

शाह मेटाकॉर्पचा शेअर - हा पेनी शेअर दलाल स्ट्रीटवर बी कॅटेगिरीमध्ये ल‍िस्‍टेड आहे. हा स्मॉल-कॅप स्टॉक गेल्या पाच व्यवहाराच्या सत्रांत जेवळपास 38 टक्क्यांच्या तेजीसह 3.33 रुपयांवरून 4.60 रुपये प्रत‍ि शेअरपर्यंत पोहोचला आहे. 5 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा स्मॉल-कॅप स्टॉक बुधवार आणि शुक्रवारच्या व्यवहाराच्या सत्रात अपर सक्रिटवर पोहोचला होता.

अलस्‍टोन टेक्‍साटाइल इंड‍िया ल‍िमिटेड - हा शेअरही एक्‍स कॅटेकरीमध्ये ल‍िस्‍टेड आहे. गेल्या आठवड्यातील सर्वच व्यवहाराच्या सत्रांमध्ये या स्मॉल-कॅप स्टॉकने अपर सर्किटला स्पर्श केला होता. एक रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेला हा शेअर गेल्या आठवड्यात 0.70 पैशांनी वाढून 0.96 रुपयांवर पोहोचला.

पेनी स्‍टॉक म्हणजे काय - ज्या शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते अशा शेअर्सना पेनी स्टॉक्स म्हटले जाते. काही दिग्गज कंपन्यांच्या शेअरची किंमतही कमी असते. पण ते पेनी स्टॉकच्या कॅटेगिरीत येत नाहीत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)