Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:53 IST2025-10-02T09:42:38+5:302025-10-02T09:53:20+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, परंतु या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात पेन्शनची चिंता कमी होईल. यामुळे तुम्हाला दरमहा ₹२०,५०० मिळतील.

Post Office Investment Scheme: निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल अनेक लोक चिंतेत असतात. पेन्शनची काळजी प्रत्येकाला सतावत असते, पण चांगली बातमी अशी आहे की पोस्ट ऑफिसची एक योजना तुमची ही चिंता दूर करू शकते.

आज आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल (Senior Citizen Savings Scheme - SCSS) बोलत आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा २०,५०० रुपये मिळवू शकता. ही योजना खास करून ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही निवृत्तीचं नियोजन करत असाल, तर हा तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

या योजनेत तुम्हाला वार्षिक ८.२ टक्के दरानं व्याज मिळतं. समजा तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले. तर एका वर्षात तुम्हाला २.४६ लाख रुपये व्याज मिळेल. आता याला १२ महिन्यांमध्ये विभागले, तर दरमहा सुमारे २०,५०० रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

ही रक्कम तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी खूप मदत करेल. निवृत्तीनंतर जेव्हा पगार किंवा नोकरीतून मिळणारं उत्पन्न थांबतं, तेव्हा हे मासिक उत्पन्न पेन्शनसारखं काम करेल. विचार करा, कोणत्याही त्रासाशिवाय दरमहा एवढे पैसे मिळत राहिलं तर आयुष्य किती सोपं होईल.

आता गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, पूर्वी या योजनेत फक्त १५ लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येत होती, पण आता ती मर्यादा वाढवून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच, तुम्ही अधिक पैसे जमा करून अधिक व्याज कमवू शकता.

ही योजना ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आहे. पण जर तुम्ही ५५ ते ६० वर्षांदरम्यान निवृत्त झाला असाल, तरीही तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत जाऊन तुम्ही सहजपणे खातं उघडू शकता. गुंतवणूकीची मूळ रक्कम (Principal Amount) करमुक्त आहे, परंतु व्याजावर कर लागेल. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी कराचे नियम व्यवस्थित समजून घ्या. जर तुमचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर TDS कपातीची मर्यादा थोडी वेगळी असते, पण एकूणच ही योजना सुरक्षित आणि सरकारी असल्यामुळे विश्वसनीय आ

ही योजना पाच वर्षांसाठी असते, पण तुम्ही ती तीन वर्षांनी वाढवू शकता. गरज पडल्यास, मूळ रक्कम काढताही येते, पण यासाठी काही दंड आकारला जाऊ शकतो. निवृत्तीनंतरच्या दिवसांत अनेक लोक विचार करतात की पैसे कुठे गुंतवावेत जे सुरक्षित असतील आणि नियमित उत्पन्न देतील. SCSS अगदी तशीच आहे. यामध्ये बाजाराची कोणतीही जोखीम नाही, कारण ही सरकारी योजना आहे.

लाखो ज्येष्ठ नागरिक ही योजना निवडतात. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झाला असाल किंवा लवकरच होणार असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याची माहिती घ्या. आधार, पॅन कार्ड आणि फोटो यांसारख्या कागदपत्रांसह तुम्ही सहजपणे सुरुवात करू शकता.