1 / 10कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी अनेक ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे. बँकांनीही आपल्या कामाकाजाच्या वेळांमध्ये आणि अन्य महत्त्वाच्या कामांमध्ये बदल केले आहेत.2 / 10देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं आपल्या वैयक्तिक ग्राहकांसाठी नॉन-होम ब्रान्चमध्ये रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. 3 / 10आता ग्राहकांना नॉन-होम ब्रान्चमध्ये जाऊन चेकद्वारे एका दिवसाला केवळ १ लाख रूपयांपर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे. एसबीआयनं ट्वीटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.4 / 10बचत खात्याच्या पासबुकद्वारे पैसे काढण्याचा फॉर्म वापरून एका दिवसाला आता केवय़ळ २५ हजारांपर्यंतचीच रोख रक्कम काढता येणार आहे. 5 / 10तर दुसरीकडे चेकद्वारे स्वत:साठी एका दिवसांत केवळ १ लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. 6 / 10तर थर्ड पार्टीसाठी केवळ चेकद्वारे एका दिवसांत ५० हजार रूपयांपर्यंतची मर्यादा घालून देण्यात आली आहे. 7 / 10स्टेट बँकेकडून लागू करण्यात आलेले हे नवे नियम ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. 8 / 10थर्ड पार्टी कॅश पेमेंटसाठी फॉर्म न दिल्यास चेकद्वारे रोख रक्कम दिली जाईल. यासाठी थर्ड पार्टीला केव्हायसी सबमिट करावं लागेल.9 / 10सध्या स्टेट बँकेच्या देशभरात २२ हजारांपेक्षा अधिक ब्रान्च आहेत. तर याव्यतिरिक्त त्यांचे देशात ५८ हजारांच्या जवळपास एटीएम/सीडीएम नेटवर्क्स आहेत आणि बीसी आऊटलेट्सही ७१ हजारांपेक्षा अधिक आहेत.10 / 10सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही स्टेट बँकेचे देशातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.