SBI : एक मिस्ड कॉल द्या, मिळवा १४ लाखांचं कर्ज; पाहा काय आहे ही योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 03:01 PM2021-03-01T15:01:06+5:302021-03-01T15:19:44+5:30

State Bank Of India : पाहा कोणाला आणि किती वर्षापर्यंत घेता येईल कर्ज

भारतीय स्टेट बँकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चांगली योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एका मिस्ड कॉलवर १४ लाखांपर्यंतच कर्ज मिळू शकणार आहे.

या कर्जासाठी केवळ एक फोन कॉलच पुरेसा आहे. याव्यतिरिक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारेही कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.

जर ज्येष्ठ नागरिकांना कर्ज घ्यायचं असेल तर त्यांना ७२०८९३३१४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर बँकेकडून ग्राहकांना कॉल केला जाईल आणि अर्जाची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल.

या पेन्शन लोनची एक विशेष बाब म्हणजे यामध्ये प्रोसेसिंग फीदेखील कमी आणि कागदपत्रेदेखील कमी द्यावी लागतील. याव्यतिरिक्त ग्राहकांना स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल.

स्टेट बँक ९.७५ ते १०.२५ टक्के व्याजदरानं कर्ज देणार आहे. परंतु यासाठी असलेली अट म्हणजे यासाठी पेन्शन खातेधारकाचं वय ७६ वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पेन्शन धारकांचं पेन्शन खातंही स्टेट बँकेत असणं आवश्यक आहे.

स्टेट बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार माहिती केंद्रातून याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी १८००११२२११ या क्रमांकावर कॉल करावा लागेल.

तसंच ७२०८९३३१४५ या क्रमांकावर PERSONAL असं कॅपिटलमध्ये लिहून एसएमएद्वारेही माहिती मिळवता येईल.

जर संबंधित खातेधारक हा केंद्र सरकारचा पेन्शनधारक असेल तर त्यांचं वय ७६ वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तसंत पेन्शन पेमेंट ऑर्डर एसबीआयसोबत मेंटेन असणंही अनिवार्य आहे.

याव्यतिरिक्त पेन्शन धारकाला जोपर्यंत कर्जाचा कालावधी पूर्ण होणार नाही तोवर ट्रेजरीला दिलेल्या मँडेटमध्ये बदल केला जाणार नाही असंही लिखित स्वरूपात द्यावं लागेल.

याव्यतिरिक्त ट्रेजरीलाहेदेखील लिखित स्वरूपात द्यावं लागेल की जर बँकेकडून एनओसी जारी केली नाही तर पेन्शनधारक पेन्शन पेमेंट कोणत्याही अन्य बँकेत ट्रान्सफर करण्याचं स्वीकारणार नाही.

डिफेन्स पेन्शनर्ससाठी किमान वय निर्धारित करण्यात आलं नाही. परंतु कर्ज घेताना त्यांचं वयदेखील ७६ पेक्षा अधिक असू नये अशी अट ठेवण्यात आली आहे.

फॅमिली पेन्शनर्स अंतर्गत पेन्शनर्सचा मृत्यू झाला तर कुटुंबातील ज्या व्यक्तीला पेन्शन मिळत आहे त्याला ७६ वर्षांच्या वयापर्यंत कर्ज घेता येऊ शकेल.

केंद्र आणि राज्य राज्य सरकारच्या पेन्शनर्सना वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत ६० महिन्यांसाठी १४ लाखांचं कर्ज, ७२-७२ वर्षांपर्यंत ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी १२ लाखांचं कर्ज आणि ७४-७६ वर्षांसाठी २४ महिन्यांच्या कालावाधीसह ७.५ लाख रूपयांचं कर्ज मिळणार आहे.

डिफेन्स पेन्शनर्ससाठी ५६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना ८४ महिन्यांच्या कालावधीसाठी १४ लाख रूपये, ५८ ते ७२ वर्षांसाठी ६० महिन्यांच्या कालावधीसाठी १४ लाखांचं कर्ज, ७२-७४ या वर्षात ४८ महिन्यांच्या कालावधीसह १२ लाख रुपये आणि ७४ ते ७६ या कालावदीत २४ महिन्यांसाठी ७.५ लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे.

फॅमिली पेन्सनर्सबाबात सांगायचं झालं तर त्यांना ७२ वर्षापर्यंत ६० महिन्यांच्या कालावधीसाठी ५ लाख रूपये, ७२-७४ या वर्षांमध्ये ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी ४.५ लाख रूपयांचं तर ७४ ते ७६ वर्षांपर्यंत २४ महिन्यांच्या कालावधीसाठी २.५ लाखांचं कर्ज देण्यात येईल.

फॅमिली पेन्शनर्सच्या प्रकरणांमध्ये ईएमआय आणि नेट मंथली इन्कमचं प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

अन्य सर्व प्रकारच्या पेन्शनर्ससाठी हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

प्रीपेमेंट केल्यास रकमेच्या ३ टक्के चार्ज भरावा लागेल. परंतु त्या योजनेअंतर्गत नवं कर्ज घेतल्यास प्रीपेमेंट चार्ज द्यावा लागणार नाही.

ईएमआयची रक्कम ही पेन्शन खात्यातून डेबिट केली जाणार आहे.

पेन्शन लोन अंतर्गत गॅरेंटर कुचुंबवाती पेन्शनर्सच्या पात्र सदस्य किंवा कुटुंबातील कोणत्या अन्य सदस्याला बनवलं जाईल.