बाजारात बुलेट ट्रेन बनलाय हा शेअर, ₹10,000 चे झाले 1.25 कोटी, गुंतवणूकदारांना बनवलं कोरडपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:07 PM2023-03-21T12:07:47+5:302023-03-21T12:12:57+5:30

या शेअरमध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदार कोट्यधीश बनले आहेतत.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना नेहमीच एखाद्या चांगल्या शेअरमध्ये पैसा गुंतवून परताव्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला जातो. हे गुजरातमधील सिंथेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी रेझिन अॅडेसिव्ह्सने सिद्ध केले आहे.

या शेअरमध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदार कोट्यधीश बनले आहेतत. गेल्या केवळ 15 वर्षातच या कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 1,25,539 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कर्ज मुक्त कंपनी resin adhesives च्या एका शेअरचा भाव मार्च 2008 मध्ये 0.89 पैशे होता. तो 17 मार्च 2023 रोजी 1114 रुपयांवर ट्रेड करत होता. तेव्हा ज्या गुंतवणूकदारांनी resin adhesives मध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याचा परतावा वाढून आता जवळपास 1.25 कोटी रुपये झाले आहेत.

गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे, आर्थिक वर्ष 22 मध्ये कंपनीच्या सेल्समध्ये 35 टक्के आणि नेट प्रॉफिटमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

गुंतवणूकदारांसाठी कसं होतं मागील वर्ष? - resin adhesives च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरादरम्यान 80 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. मात्र, गेली सहा महिने गुंतवणूकदारांसाठी फारशी चांगली राहिली नाहीत. या काळात कंपनीच्या शेअरचा भाव 32 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

घसरणीचा हा ट्रेंड गेल्या महिनाभरापासून सुरूच आहे. या दरम्यान कंपनीचा शेअर 12 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. महत्वाचे म्हणजे, कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1818.45 रुपये प्रति शेअर, तर 52 आठवड्यांतील निचांक 606.67 रुपये प्रति शेअर आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)