Jio चा मोठा धमाका, फक्त 1 रुपयांत 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन लॉन्च; जाणून घ्या, किती मिळणार डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 04:20 PM2021-12-15T16:20:24+5:302021-12-15T16:33:41+5:30

जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर उपलब्ध नसून My Jio या मोबाइल अॅपवर चेक केला जाऊ शकतो. हा प्लॅन अॅपमध्ये देण्यात आलेल्या 4G Data Voucher च्या व्हॅल्यू सेक्शनमधील 'Other Plans' मध्ये दिसू शकेल.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) युजर्ससाठी आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. जिओच्या या प्लॅनची किंमत केवळ 1 रुपया आहे. या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी डेटासह 30 दिवसांची वैधता देखील देत आहे.

जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर उपलब्ध नसून My Jio या मोबाइल अॅपवर चेक केला जाऊ शकतो. हा प्लॅन अॅपमध्ये देण्यात आलेल्या 4G Data Voucher च्या व्हॅल्यू सेक्शनमधील 'Other Plans' मध्ये दिसू शकेल.

असा मिळेल 10 रुपयांत 1जीबी डेटा - कंपनी या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देत आहे. या डेटा व्हाउचरमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी 100MB डेटा देत आहे. अशात, आपण 1 रुपयाच्या व्हाउचरने 10 वेळा रिचार्ज केले तर तुम्हाला 10 रुपयांमध्ये तब्बल 1 जीबी डेटा मिळेल.

अशा पद्धतीने रिचार्ज केल्यास, 1 जीबी डेटा ऑफर करणार्‍या Jio च्या 15 रुपयांच्या डेटा व्हाउचरपेक्षाही हे स्वस्त पडते. तसेच, प्लॅनमधील उपलब्ध डेटा खर्च झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होईल.

1 रुपयांचा प्लॅन ऑफर करणारी पहिलीच कंपनी - रिलायन्स जिओ ही देशातील 1 रुपयांचा प्लॅन ऑफर करणारी पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे. ज्या यूजर्सना डेटाची फारशी आवश्यकता नाही, अशांसाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. एवढेच नाही, तर सेकंडरी जिओ नंबर सक्रिय ठेवण्यासाठीही या प्लॅनचा वापर करता येऊ शकतो.

'या' यूजर्सना आकर्षित करण्याचा प्लॅन - हा प्लॅन सेकंडरी नंबरवर सब्सक्राइब केल्यास युजर्सना इनकमिंग कॉल तर रिसिव्ह करता येईलच, याशिवाय त्यांना डेटाही यूज करता येईल. हा प्लॅन अशा युजर्सनाही आपल्याकडे आकर्षित करू शकतो, जे टेरिफ हाइकनंतर एअरटेल अथवा व्होडाफोन-आयडियाला राम राम ठोकाण्याचा विचार करत आहेत.