महिन्याला केवळ ६० रूपये खर्च; Reliance Jio च्या 'या' विशेष प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेडेट डेटा आणि कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:26 AM2021-02-27T10:26:47+5:302021-02-27T10:31:10+5:30

reliance jio : ग्राहकांना या प्लॅनसोबत मिळतायत अनेक बेनिफिट्स

रिलायन्स जिओनं बाजारात एन्ट्री घेतल्यापासून सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी मोफत डेटा आणि मोफत कॉलिंग देण्याची सेवा सुरू केली होती.

रिलायन्स जिओ सातत्यानं काही नवनव्या ऑफर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा रिलायन्स जिओनं न्यू जिओफोन २०२१ ही ऑफर आणली आहे.

या ऑफर अंतर्गत नव्या युझर्ससाठी १९९९ रूपये आणि १४९९ रूपयांचे प्लॅन आणले आहेत. ७४९ रूपयांचा येणारा प्लॅनदेखील खास आहे.

यामध्ये रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षभर रिचार्ज करावं लागणार नाही. जिओफोनच्या या प्लॅनचा महिन्याचा खर्च केवळ ६० रूपये आहे. जाणून घेऊया या प्लॅनसोबत काय बेनिफिट्स मिळतात.

जिओ फोनच्या ७४९ रूपयांच्या ऑफरमध्ये १२ महिन्यांसाठी अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. यामध्ये युझर्सना ३६५ दिवसांसाठी फ्री व्हॉईस कॉलिंगचाही फायदा मिळेत.

तसंच या प्लॅनसोबत दर महिन्याला २ जीबी हायस्पीड आणि त्यानंतर अनलिमिटेड असा डेटा देण्यात येईल. १ मार्चपासून जिओची ही ऑफर सुरू होणार आहे.

परंतु जिओनं या प्लॅनसोबत एसएमएस सेवा मिळेल का नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नाही.

जिओ फोन्ससाठी रिलायन्स जिओचा १४९९ रूपयांचा एक प्लॅनदेखील आहे. या प्लॅनचा महिन्याचा खर्च केवळ १२५ रूपये इतका आहे.

या ऑफर अंतर्गत ग्राहकांना जिओ फोन डिव्हाईसदेखील मिळेल. यासोबतच वर्षभरासाठी मोफत कॉलिंगही मिळेल.

याशिवाय दर महिन्याला २ जीबी डेटा आणि त्यानंतर अनलिमिटेड डेटादेखील देण्यात येणार आहे.