स्मार्टफोनवर पाहा IPL; Reliance Jio च्या प्लॅनसह मिळतंय Disney + Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 01:25 PM2021-04-05T13:25:09+5:302021-04-05T13:33:08+5:30

पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स आणि आणखी कोणते मिळतायत बेनिफिट्स

लवकरच आता इंडियन प्रिमिअल लीगच्या (IPL) चौदाव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.

तसंच हे सामने ३० मे पर्यंत सुरू राहणार आहेत. दरम्यान स्मार्टफोन युझर्सना IPL चे हे सामने Disney + Hotstar वर पाहायला मिळणार आहेत.

या सबस्क्रिप्शनची किंमत ३९९ रूपये आहे. परंतु रिलायन्स जिओच्या काही प्लॅन्ससोबत Disney + Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे.

४०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शन देत आहे. हा रिलायन्स जिओचा सबस्क्रिप्शन आणि अधिक डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह रोज ३ जीबी डेटाही देण्यात येतो.

याव्यतिरिक्त या प्लॅनसोबत ६ जीबी अतिरिक्त डेटाही मिळतो. याप्रकारे महिन्याला एकूण ९० जीबी डेटा मिळतो.

तसंच या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमसही दिले जातात. युझर्सना या प्लॅनसह जिओ अॅप्सची मेंबरशीपही दिली जाते.

रोज २ जीबी डेटा मिळणारा ५९८ रुपयांचा प्लॅन खुप लोकप्रिय आहे. यामध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. तसंच यामध्ये ग्राहकांना एकूण १२ जीबी डेटा देण्यात येतो.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमसही देण्यात येतात.

याशिवाय युझर्सना या प्लॅनसह Disney + Hotstar चं एका वर्षाचं आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं.

रिलायन्स जिओच्या ७७७ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. तसंच यात दररोज १.५ जीबी डेटा आणि ५ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येतो. यानुसार ग्राहकांना १३१ जीबी डेटा मिळतो.

प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसही मिळतात. याव्यतिरिक्त ग्राहकांना जिओ अॅप्स आणि एका वर्षासाठी Disney + Hotstar चं सबस्क्रिप्शनही मिळतं.

रिलायन्स जिओचा २५९९ रूपयांचा प्लॅन हा सर्वात महागडा प्लॅन आहे. यामध्ये Disney + Hotstar ची मेंबरशिपही दिली जाते. तसंच हा वर्षभराच्या वैधतेसह येणारा प्लॅन आहे.

या प्लॅनसह ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. तसंच यासह १० जीबी अतिरिक्त डेटाही मिळतो. यानुसार ग्राहकांना वर्षासाठी ७४० जीबी डेटा देण्यात येतो.

या प्लॅनसह ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सची मोफत मेंबरशिप दिली जाते.