Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन; केवळ ७५ रूपये खर्च करून मिळवा ६० दिवसांसाठी फ्री कॉलिंग, डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:43 PM2021-06-23T17:43:38+5:302021-06-23T17:47:50+5:30

सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) अनेक उत्तम प्लॅन लाँच करत आहे. ७५ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. पाहा काय आहे ऑफर.

सध्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियासारख्या (Vodafone-Idea) कंपन्या ग्राहकांना अनेक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. सध्या रिलायन्स जिओकडे परवडणारे अनेक प्लॅन्स आहेत.

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ७५ रूपयांचा आहे. या अंतर्गत कंपनी ग्राहकांना तब्बल दोन महिन्यांची वैधता देत आहे.

कंपनीचा ७५ रूपयांचा प्लॅन हा रिलायन्स जिओ फोनसाठी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंगसह डेटाचाही फायदा मिळतो. पाहूया या प्लॅनमध्ये कोणते मिळतायत ऑफर्स.

७५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. परंतु सध्या सुरू असलेल्या विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना १ प्लॅनवर १ प्लॅन फ्री देण्यात येत आहे.

याचाच अर्थ ग्राहकांनं ७५ रूपयांचा प्लॅन घेतला तर त्यांनी २८ ऐवजी ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा देण्यात येतो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना एकूण सहा जीबी डेटा मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. यासोबत रिलायन्स जिओच्या अॅप्सचं मोफत सबस्क्रीप्शनही मिळतं.

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३९ रूपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना १४ दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनसोबतही एका प्लॅनवर एक प्लॅन फ्री अशी ऑफर मिळत आहे.

ग्राहकांना ३९ रूपयांच्या प्लॅनसोबत २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि एकून २.८ जीबी डेटाही देण्यात येतो. यासोबत ग्राहकांना जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही मिळतं.

यापूर्वी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओनं ग्राहकांच्या सोयीसाठी एकावर एक प्लॅन मोफत देण्याची घोषणा केली होती.

रिलायन्स जिओनंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या ग्राहकांसाठी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गैरसोय होऊ नये म्हणून काही ऑफर्स देण्याचा निर्णय घेतला होता.