Reliance Jio चा २५० रूपयांपेक्षा स्वस्त Recharge प्लॅन; रोज मिळणार २ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स

Published: May 17, 2021 12:15 PM2021-05-17T12:15:25+5:302021-05-17T12:20:27+5:30

Reliance Jio : पाहा कोणते मिळतायत अतिरिक्त बेनिफिट्स

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना निरनिराळ्या व्हॅलिडिटीचे प्लॅन ऑफर करते.

ज्या लोकांना अधिक डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी कंपनीनं दररोज २ जीबी डेटा देणारे अनेक प्लॅन्स आणले आहेत.

आज आपण रिलायन्स जिओच्या सर्वात स्वस्त आणि दररोज २ जीबी डेटा देणाऱ्या (Jio daily 2GB data plan) बाबत पाहूया.

हा प्लॅन २५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत देण्यात येतो. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसचाही लाभ मिळतो.

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची किंमत २४९ रूपये आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येते.

तसंच दररोज २ जीबीप्रमाणे ५६ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात.

याशिवाय ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा प्लॅन दुप्पट व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी याप्रमाणे ११२ जीबी डेटा देण्यात येतो.

याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस देण्यात येतात.

तसंच योबत JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

रिलायन्स जिओचा ५९९ रूपयांचा प्लॅनमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यात दररोज २ जीबी डेटाप्रमाणे १६८ जीबी डेटा देण्यात येतो.

यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioSecurity सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!