शेअर बाजार आपटल्यानं राकेश झुनझुनवालांना 753 कोटींचा फटका; टाटाच्या 'या' शेअरमुळे झाला घाटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:37 PM2021-11-27T15:37:58+5:302021-11-27T16:05:30+5:30

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या टायटन कंपनीचा शेअर शुक्रवारी सुमारे 4.37 टक्क्यांनी घसरला. या आठवड्यात या टाटा कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या घसरणीदरम्यान, किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण त्यांच्या स्टॉक पोर्टफोलिओला मोठा धक्का बसला आहे. भारतातील शेअर बाजाराच्या या मोठ्या घसरणीत बड्या गुंतवणूकदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या टायटन कंपनीचा शेअर शुक्रवारी सुमारे 4.37 टक्क्यांनी घसरला. या आठवड्यात या टाटा कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. (Rakesh Jhunjhunwala Shares)

टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे या आठवड्यात राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सुमारे 753 कोटी रुपयांची घट झाली आहे. टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासाचा विचार करता, राकेश झुनझुनवाला यांच्या शेअरची किंमत सुमारे 2374 रुपयांवरून 2293 रुपये प्रति शेअरपर्यंत घसरली आहे.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची कंपनीत किती आहे भागिदारी? - शेअर बाजार कोसळल्याने इंट्राडेमध्ये सुमारे 105 रुपयांची किंवा सुमारे 4.40 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या एका आठवड्यात टायटन कंपनीचे शेअर्स 2467 रुपयांवरून 2293 रुपयांपर्यंत घसरले असून, या कालावधीत प्रति शेअर 174 रुपयांनी घसरला अथवा सुमारे 7 टक्क्यांनी नुकसान झाले आहे.

जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टाटा ग्रुपच्या या कंपनीत शेअरहोल्डिंग आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी कॅपिटलच्या 3.80 टक्के एवढे आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सा आहे.

अर्थात, राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे एकत्रितपणे कंपनीचे 4,33,00,970 शेअर्स आहेत अथवा या कंपनीत त्यांची संयुक्तपणे 4.87 टक्के हिस्सेदारी आहे.

किती झाली शेअर्सची किंमत? - या आठवड्यात टायटन कंपनीच्या शेअर्सची किंमत 174 रुपयांपर्यंत घसरली. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांचे सुमारे 753 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

झुनझुनवाला यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्समधील त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार झुनझुनवाला यांचा कंपनीतील हिस्सा 1.04 टक्क्यांवरून 1.08 टक्क्यांवर पोहोचला आहे.

झुनझुनवाला यांनी पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 30 लाख 75 हजार 687 शेअर्स आहेत. जून तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 29 लाख 50 हजार 687 शेअर्स होते.

Read in English