प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:27 IST2025-07-04T14:24:04+5:302025-07-04T14:27:38+5:30
Prada in legal trouble : इटालियन फॅशन ब्रँड 'प्राडा'ने (Prada) कोल्हापुरी चप्पलची हुबेहुब नक्कल केल्याने कंपनीविरोधात याचिक दाखल करण्यात आली आहे.

इटालियन फॅशन ब्रँड 'प्राडा'ने (Prada) कोल्हापुरी चप्पलची हुबेहुब नक्कल केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताला श्रेय न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयात प्राडाविरोधात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत प्राडाने भारतीय कारागिरांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राची पारंपरिक ओळख आहे.
बौद्धिक संपदा हक्कांचे (Intellectual Property Rights) वकील गणेश एस. हिंगेमिरे यांनी २ जुलै रोजी ही याचिका दाखल केली आहे. प्राडाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.
तसेच, भारतीय पारंपरिक डिझाईन्सचे संरक्षण करण्यासाठी सरकारने योग्य निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. जीआय-टॅग (Geographical Indication - GI Tag) असलेल्या उत्पादनाचे हे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
या अनधिकृत वापरामुळे महाराष्ट्रातील संबंधित कारागीर समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे याचिकेत स्पष्ट नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अशा जीआय उत्पादनांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पारंपरिक उत्पादनांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होण्याची शक्यता आहे. ही याचिका भारतीय कारागिरांच्या हक्कासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.