By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:34 IST
1 / 5Poultry Farm Business: शेतीसोबत उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत शोधणाऱ्यांसाठी कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) हा एक विश्वासार्ह आणि नफ्याचा व्यवसाय आहे. अंडी आणि चिकनच्या वाढत्या मागणीमुळे हा व्यवसाय स्टार्टअपच्या रूपातही वेगाने पुढे येत आहे. विशेष म्हणजे, हा व्यवसाय लहान स्तरावर सुरू करून हळूहळू मोठा करता येतो.2 / 5१०० कोंबड्यांपासून सुरुवात करणे हा कमी जोखमीचा पर्याय मानला जातो. १०० पिल्लांची किंमत सुमारे ३,००० ते ४,००० रुपये. शेड, भांडी आणि खाद्य खर्च १०,००० ते १५,०००...असा एकूण खर्च फक्त २०,००० ते २५,००० रुपये येतो. शेडसाठी बांबू किंवा जुने लाकूड वापरल्यास खर्च आणखी कमी करता येतो. योग्य देखभाल आणि लसीकरण केल्यास नुकसान टाळता येते.3 / 5कुक्कुटपालनातून दोन प्रमुख मार्गांनी उत्पन्न मिळते. पहिले म्हणजे, अंडी विक्री. एक कोंबडी वर्षाला १५० ते २५० अंडी देते. १०० कोंबड्यांमधून महिन्याला १०,००० ते १५,००० रुपये उत्पन्न मिळवता येते. दुसरे म्हणजे, तयार कोंबड्यांची विक्री. ५-६ महिन्यांत कोंबड्या विक्रीसाठी तयार होतात. एका कोंबडीची किंमत २००-५०० जाते रुपये असते. अशाप्रकारे महिन्याला २५,००० ते ३०,००० रुपये प्रति महिना कमवता येतात.4 / 5विशेष म्हणजे, कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. National Livestock Mission अंतर्गत ४०% ते ५०% सबसिडी आणि पशुसंवर्धन विभागाकडून मोफत प्रशिक्षणदेखील मिळते. याशिवाय, बँकांकडून कर्ज सुविधा (किसान क्रेडिट कार्ड, अॅग्री-लोन) आणि AHIDF सारख्या योजनांमधूनही आर्थिक मदत उपलब्ध होते.5 / 5कमी गुंतवणूक, सरकारी मदत आणि वाढती बाजारपेठ यामुळे कुक्कुटपालन हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय कमी वेळात नफ्यात येऊ शकतो आणि तरुणांना यशस्वी उद्योजक बनवू शकतो.