Post Office Scheme: ‘या’ सरकारी स्कीममध्ये मिळतात बँकांपेक्षा जास्त रिटर्न्स, पाहा कसा घ्याल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:32 PM2022-09-08T16:32:20+5:302022-09-08T16:36:05+5:30

Post Office Scheme: या स्कीममध्ये वार्षिक 7.4 टक्क्यांचं व्याज मिळत आहे.

Post Office Scheme: निवृत्तीनंतर आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा असावा असा सामान्यपणे लोकांचा विचार असतो. यासाठी बरेचदा आपण निरनिराळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो. पोस्ट ऑफिसनेही आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो आणि तुमचे भविष्य सुरक्षित होऊ शकते.

पोस्ट ऑफिस सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (Post Office Senior Citizen Savings Scheme) असे या योजनेचे नाव आहे. परताव्याच्या बाबतीत सुकन्या समृद्धी योजनेनंतर ही दुसरी सर्वोत्तम योजना आहे. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे आणि त्यावर वार्षिक 7.4 टक्के व्याज देण्यात येते.

ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर आहे. यामध्ये तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूटही मिळेल. या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत, फक्त 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाच खातं उघडण्याची परवानगी आहे. याशिवाय, या योजनेअंतर्गत, संबंधित व्यक्तीला स्वतंत्र किंवा आपल्या पती अथवा पत्नीसह एकत्र एक किंवा अधइक अकाऊंट सुरू करता येऊ शकतात. परंतु सर्व मिळून गुंतवणूक 15 लाखांपेक्षा जास्त नसावी.

या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. यानंतर मॅच्युरिटी पुन्हा 3 वर्षांसाठी वाढवता येते. प्री मॅच्युअर बंद केल्यास दंड आकारला जातो. गुंतवणुकीच्या एक वर्षानंतर परंतु 2 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, गुंतवणूकदाराला 1.5 टक्के शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, 2 वर्षांनंतर परंतु 5 वर्षापूर्वी खाते बंद करण्यासाठी 1 टक्का दंड आकारला जातो. तर 1 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास व्याज मिळणार नाही.