Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा

By जयदीप दाभोळकर | Updated: October 30, 2025 08:56 IST2025-10-30T08:40:32+5:302025-10-30T08:56:34+5:30

Post Office Investment Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी बचत करतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो, जिथे पैसा सुरक्षित तर राहीलच पण जोरदार परतावाही मिळेल.

Post Office Investment Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी बचत करतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो, जिथे पैसा सुरक्षित तर राहीलच पण जोरदार परतावाही मिळेल. या बाबतीत पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office) चालवल्या जाणाऱ्या बचत योजना (Saving Schemes) खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये लहान मुलांपासून तरुण, महिला आणि वृद्धांपर्यंतच्या लोकांसाठी योजना उपलब्ध आहेत.

यापैकी 'पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम' (Post Office Senior Citizen Scheme - SCSS) खूप खास आहे, कारण यात गुंतवणूक केल्यास केवळ व्याजातूनच दरमहा रु. २०,५०० कमावता येतात. यासोबतच कर सवलतीचा (Tax Benefits) फायदाही मिळतो. याबद्दल जाणून घेऊया...

'पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम' ही पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांमध्ये तिच्या याच वैशिष्ट्यामुळे सर्वाधिक लोकप्रिय योजनांच्या यादीत समाविष्ट आहे, कारण यात एकरकमी गुंतवणूक करून दरमहा २०,००० रुपयांपेक्षा जास्त कमाई निश्चित होते. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि दरमहा नियमित उत्पन्न निश्चित होईल.

या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये सरकारकडून जमा रकमेवर जबरदस्त व्याज दिलं जातं. होय, गुंतवणूकदाराला ८.२% दरानं वार्षिक व्याज मिळतं. यानुसार, तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर महिन्याचे नियमित उत्पन्न निश्चित होतं. विशेष बाब म्हणजे यात अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या तुलनेत अधिक व्याजदर दिला जात आहे. तसंच, यात केलेल्या गुंतवणुकीवर सरकारकडून आयकर सवलतही दिली जाते, जी कलम ८०सी अंतर्गत १.५ लाखांपर्यंत मिळते.

या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळ आर्थिक अडचणींशिवाय आरामात जाऊ शकतो. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, यात ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती सिंगल किंवा जॉईंट खातं उघडू शकते. याव्यतिरिक्त, नागरी क्षेत्रातील सरकारी पदांवरून 'स्वैच्छिक सेवानिवृत्ती' घेणारे ५५ ते ६० वर्षांच्या वयाचे लोक किंवा संरक्षण क्षेत्रातील (आर्मी, एअर फोर्स, नेव्हीसह इतर सुरक्षा दलांतून निवृत्त) ५० ते ६० वर्षांच्या वयाचे लोक खातं उघडू शकतात.

आता वार्षिक व्याजातून होणारी कमाई आणि या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणुकीद्वारे दरमहा नियमित उत्पन्न कसं मिळू शकतं याबद्दल जाणून घेऊ. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एकरकमी ३० लाख रुपये गुंतवले, तर सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या ८.२% व्याज दरानुसार, एवढ्या गुंतवणुकीवर वार्षिक २.४६ रुपये लाख व्याज मिळेल. याला जर दरमहा विभागलं, तर महिन्याला २०,५०० चं उत्पन्न निश्चित आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे.

पोस्ट ऑफिसची SCSS योजना कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडता येते. यात खातं उघडल्यानंतर कधीही ते बंद करण्याची सुविधाही गुंतवणूकदाराला दिली जाते. परंतु, यासाठी नियम निश्चित आहेत, ज्यानुसार जर खातं उघडल्यापासून एका वर्षापेक्षा कमी कालावधीत बंद केलं, तर गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतंही व्याज मिळणार नाही.

तर १ वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा २ वर्षांच्या दरम्यान ते बंद केल्यास, व्याजाच्या रकमेतून १.५% कपात केली जाईल. त्याचप्रमाणे, २ ते ५ वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास, व्याजाच्या रकमेतून १% रक्कम कापली जाईल.