98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:11 IST2025-07-10T17:53:17+5:302025-07-10T18:11:33+5:30

पीसी ज्वेलरचा शेअर ९८ टक्क्यांनी घसरून ९६ पैशांवर पोहोचला होता. मात्र, ही नीचांकी पातळी गाठल्यानंतर, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १८०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे...

शेअर बाजारातील पेनी स्टॉक पीसी ज्वेलरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. पीसी ज्वेलरचा शेअर गुरुवारी बीएसईवर ५ टक्क्यांहून अधिकने वधारून १९.४३ रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये ५ दिवसांत ३० टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्याचा विचार करता, हा शेअर ५५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

पीसी ज्वेलरचा शेअर ९८ टक्क्यांनी घसरून ९६ पैशांवर पोहोचला होता. मात्र, ही नीचांकी पातळी गाठल्यानंतर, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १८०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. पीसी ज्वेलरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १९.६५ रुपये आहे. तर नीचांकी पातळी ६.०४ रुपये एवढी आहे.

98% ने घसरून 96 पैशांवर पोहोचला होता शेअर - शेअर्स ९८% घसरून ९६ पैशांवर आले १९ जानेवारी २०१८ रोजी पीसी ज्वेलर लिमिटेड कंपनीचा शेअर ५८.६५ रुपयांवर होते. मात्र तो झपाट्याने घसरून २७ मार्च २०२० रोजी ९६ पैशांवर आला. मात्र, यानंतर या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे.

कंपनीचा शेअर ९६ पैशांच्या पातळीपासून १८०० टक्क्यांहून अधिक वधारला असून १० जुलै २०२५ रोजी १९.४३ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीचा शेअर १११० टक्क्यांहून अधिक वधाला आहे. तर गेल्या दोन वर्षांचा विचार करता, कंपनीचा शेअर ५४० टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

कर्ज मुक्त होण्याच्या तयारीत कंपनी - ज्वेलर कंपनी पीसी ज्वेलर लिमिटेड पूर्णपणे कर्जमुक्त होण्याच्या तयारीत आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पीसी ज्वेलरने गेल्या आर्थिक वर्षात ५० टक्क्यांहून अधिक कर्ज फेडले आहे. याशिवाय, कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७.५ टक्क्यांहून अधिक कर्ज फेडले आहे.

पहिल्याच तिमाहीत 80% एवढी महसूल वृद्धी - ज्वेलरी कंपनीने नुकतेच म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यांची वार्षिक आधारावर महसूल वृद्धी ८० टक्के एवढी आहे. सोन्याच्या किमतीत चढ-उतार असूनही वाढत्या मागणीमुळे महसुलात ही वृद्धी दिसून आली आहे.

पीसी ज्वेलरच्या मंडळाची निधी उभारण्यासंदर्भातील बैठक गुरुवार, १० जुलै रोजी होत आहे. कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा शेअर १० तुकड्यांमध्ये स्प्लिट केला होता. पीसी ज्वेलरने १० रुपयांच्या दर्शनी मूल्याचा शेअर १ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या १० शेअर्समध्ये विभागला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)