Multibagger Stock: या शेअरमध्ये ₹1 लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना 6 महिन्यांत मिळाले ₹28 लाख, आता कंपनी पुन्हा देणार खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 07:21 PM2023-04-07T19:21:29+5:302023-04-07T19:31:37+5:30

गेल्या केवळ सहा महिन्यांतच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.

शेअर बाजारात चढ-उतारची स्थिती कायमच असते. पण यातच असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही आपल्याला अशाच एका शेअरसंदर्भात माहिती देत आहोत. ज्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या केवळ सहा महिन्यांतच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे.

हा शेअर आहे व्हॅरेनियम क्लाउडचा (Varanium Cloud shares). या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने जबरदस्त परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना आता जवळपास 28 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. आज अर्थात गुरुवारी व्हॅरेनियम क्लाउडचा शेअर 700 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये सध्या सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

कंपनी देतेय बोनस शेअर - या कंपनीने नुकतीच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मार्च 2023 मध्ये 1:2 स्टॉक स्प्लिट आणि 1:1 बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती. यामुळे लिस्टिंग झाल्यापासूनच ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर होल्ड करून ठेवले, त्यांच्या शेअरमध्ये कुठल्याही गुंतवणूकीशिवाय चार पट वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना मिळाला बम्पर परतावा - हा शेअर 122 रुपयांच्या पातळीवर लाँच करण्यात आला होता. 1:1 बोनस जाहीर केल्यानंतर, गुंतवणूकदारांच्या एकूण समभागांची संख्या दोन हजार झाली. यानंतर, आता 1:2 स्टॉक स्प्लिटच्या घोषणेनंतर ही संख्या सुमारे चार हजारांवर गेली आहे.

या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 1.22 लाख रुपये जमा करायचे होते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आजपर्यंत आपले शेअर होल्ड करून ठेवले असते, तर आज त्याचे शेअर्स 4,000 वर गेले असते.

सध्या व्हॅरेनियम क्लाउडच्या शेअरची किंमत प्रति शेअर 700 रुपये एवढी आहे. अशा स्थितीत एखाद्या गुंतवणूकदाराने आजपर्यंत शेअर होल्ड करून ठेवले असते, तर आज त्याची गुंतवणूक सुमारे 28 लाख रुपये एवढी झाली असती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)