शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra कंपनीनं सुरू केली Oxygen On Wheels सेवा; महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 8:45 AM

1 / 15
गेल्या काही दिवसांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे.
2 / 15
दरम्यान, अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता असल्याचंही दिसून येत आहे.
3 / 15
या पार्श्वभूमीवर महिंद्रा लॉजिस्टिक्सनं (Mahindra Logistics) मंगळवारी ऑक्सिजन ऑन व्हिल्स (Oxygen On Wheels) सेवा सुरू केली.
4 / 15
ही एक मोफत सेवा आहे. यामुळे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांसोबत प्रोड्युसर्स कनेक्ट करण्यानं ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल.
5 / 15
सध्या महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
6 / 15
कंपनीनं परिवहन समस्या सोडवण्यासाठी १०० वाहनं सुरू केली असून आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि लवकरात लवकर ऑक्सिजन डिलिव्हरी करतील.
7 / 15
सध्या महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्सद्वारे ही सेवा पुरवण्याचं काम केलं जात आहे.
8 / 15
'महिंद्रा लॉजिस्टिक्समार्फत ही सेवा पुरविली जाईल. जी या प्रकल्पावर प्रशासन आणि स्थानिक सरकारी घटकांशी करण्यात आलेल्या करारानुसार आहे,' महिंद्रा अँड महिंद्राकडून सांगण्यात आलं.
9 / 15
दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असून इतर शहरांमध्येही ही सेवा विस्तारित करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा करत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
10 / 15
गेल्या ४८ तासांतील उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता ऑक्सिजन सिलिंडर थेट रुग्णांच्या घरी पोहोचवण्याच्या या उपक्रमाचा विचार केला जात असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
11 / 15
'आपल्यासमोरील आव्हानं सोडविण्यासाठी त्यांची संसाधने व क्षमता नावीन्यपूर्ण ठेवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत,' असं महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शहा म्हणाले.
12 / 15
ऑक्सिजन ऑन व्हील्स स्थानिक प्रशासनासोबत करार करून नागरिकांचं मोलाचं जीवन वाचवण्यासाठी आणि आरोग्य सेवेवरील दबाव कमी करण्यास मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
13 / 15
सध्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात वाहनं असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
14 / 15
तसंच एका इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेटरसोबत महिंद्रा लॉजिस्टिक्स जीवन वाचवणारा ऑक्सिजन कोणत्याही व्यत्ययाशवाय आणि न संपणाऱ्या सप्लाय चेनवर काम करत आहे.
15 / 15
तो रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांवर अशाप्रकारे पोहोचवला डाईल जे सुरक्षित आणि विश्वसनीय असेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनAnand Mahindraआनंद महिंद्राMumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणेNashikनाशिक