Join us  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंका, २.७७ कोटी मिळवा! कंगाल पाकिस्तानची क्रिकेटपटूंना ऑफर

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला १ जून पासून सुरुवात होत आहे आणि आता सर्व संघ कंबर कसून सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 8:24 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला १ जून पासून सुरुवात होत आहे आणि आता सर्व संघ कंबर कसून सज्ज झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अद्याप संघ जाहीर केला नसला तरी आयर्लंड व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी खेळाडू खेळतील हे निश्चित आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी रविवारी क्रिकेटपटूंची भेट घेतली आणि त्यांनी जाहीर केले की पाकिस्तानने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला $100,000 दिले जातील, म्हणजेच पाकिस्तानी रकमेनुसार प्रत्येकी खेळाडूला २.७७ कोटी मिळतील. 

क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, नक्वी यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पोहोचल्यावर ही टिप्पणी केली, जिथे बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने शनिवारी राष्ट्रीय शिबिराची सुरुवात केली. “पीसीबी अध्यक्षांनी दोन तास खेळाडूंसोबत चर्चा केली आणि वर्ल्ड कप तयारीची पाहणी केली.” असे बोर्डाने म्हटले आहे. पाकिस्तानचा अ गटात भारताची मुकाबला होणार आहे. १ मे ही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि आज भारताच्या आधी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांनी संघ जाहीर केले आहेत. पण, आयसीसीच्या नियमानुसार २५ मे पर्यंत या संघांमध्ये बदल केला जाऊ शकतो. 

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असताना नक्वी यांच्या घोषणेने सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. नक्वी यांनी प्रत्येक खेळाडूला १ लाख डॉलरची घोषणा करताना हे बक्षीस महत्त्वाचे नाही, तर वर्ल्ड कप जिंकणे महत्त्वाचे आहे, असे म्हटले. ते म्हणाले, खेळाडूंनी कोणताही दबाव न घेता खेळावे आणि विजय हा तुमचा असेल, तर पराभव माझा. कोणाची पर्वा करू नका, फक्त पाकिस्तानसाठी खेळा. सांघिक खेळाचे मैदानावर प्रदर्शन करा. मग बघा खुदाही तुमच्यासोबत असेल.   

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तान