IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' ५ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी; आवर्जुन लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:57 PM2021-03-12T18:57:58+5:302021-03-12T19:04:18+5:30

आयपीओ जेवढे फायदेशीर असतात, तेवढीच त्यात जोखीमही असते. चांगला परतावा मिळवायचा असेल तर शक्य तेवढा सखोल अभ्यास केला पाहिजे. कंपनीची बॅलेन्स शीट आणि नफ्याबद्दल तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे. जाणून घ्या... (know about these five important factors before investing in ipo)

मुंबई : अलीकडे शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असल्यामुळे भांडवलदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. आताच्या घडीला शेअर बाजारात कभी खुशी, कभी गम अशी अवस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. (IPO)

शेअर बाजार काही सत्रांमध्ये शेकडो अंकांची झेप घेतो, तर एक ते दोन दिवसांनी शेकडो अंकांनी घसरलेला पाहायला मिळतो. अशातच आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेकांची इच्छा असते. असे असले तरीही आयपीओतील गुंतवणूक एवढी सोपी गोष्ट नाही.

भांडवली बाजारात धडकलेल्या आयपीओ योजनांमधील ११ शेअर्सनी लिस्टिंगच्या दिवसापासूनच नफा द्यायला सुरुवात केली तर ६ स्टॉक्स दिवसाला ७० टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत. आपला आयपीओ उत्पन्न देण्याऐवजी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर असला पाहिजे, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

आयपीओमध्ये गुंतवणूक करताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. आयपीओमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टी या अत्यंत महत्त्वाच्या असतात. काही घटकांकडे लक्ष दिल्यानतंरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. आयपीओमध्ये गुंतवणूक करताना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? जाणून घेऊया... (five important factors before investing in ipo)

आयपीओमध्ये गुंतवणूक करताना बारकाइने संशोधन करण्याची आवश्यकता असते. तुम्ही संपूर्ण संशोधन करून कंपनी, त्यांचे प्रमोटर्स, क्रिमिनल रेकॉर्ड्स (असेल तर), वित्तपुरवठा, प्रतिस्पर्धी, माध्यमांतील बातम्या आणि कंपनीचे क्षेत्र किती प्रगती करत आहे, याबद्दल आपण माहिती मिळवली पाहिजे. इतर शब्दात सांगायचे म्हणजे, आयपीओमध्ये चांगला परतावा मिळवायचा असेल तर शक्य तेवढा सखोल अभ्यास केला पाहिजे.

आयपीओ म्हणजे एखादी विशिष्ट कंपनी पहिल्यांदा एक्सचेंजच्या यादीत समाविष्ट होत असते. कंपनीची सर्व संबंधित आकडेवारी डीआरएचपी किंवा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये असावी लागते. फक्त हे लक्षात घ्यावे की, हे ड्राफ्ट कंपन्यांनीच तयार केलेले असतात, निधी कमावणे, हाच त्यांचा उद्देश असतो.

अनेक गुंतवणुकदार कंपनीच्या मूल्यांकनाकडे किंवा फंडामेंटल अॅनलेसिसकडे लक्षच देत नाहीत. डीआरएचपीमध्ये जी माहिती दिलेली असते, त्यानंतरही एखादी व्यक्ती सार्वजनिक होताना फंडामेंटल अॅनलेसिस करण्यासाठी फार घटक दिसून येत नाहीत. सार्वजनिक होणारी कंपनी अशा क्षेत्रातील पहिलीच कंपनी असेल तर स्पर्धकांनुसार तिचे विश्लेषण करणे आणखी कठीण होते.

सार्वजनिक होणाऱ्या कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांकडून समृद्ध मूल्यांकनाची मागणी करणारे स्टॉक ऑफर करतात. याबद्दल अचूक कल्पना येण्यासाठी आपण नेहमीच त्याचे प्रतिस्पर्धी किंवा संबंधित क्षेत्रातील ट्रेंड समजून घेतला पाहिजे.

क्यूआयबीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. क्यूआयबीना देखील पूर्वग्रह असल्यामुळे केवळ त्यांच्यावरच विसंबून राहू नये. कोणतीही सार्वजनिक होणारी कंपनी क्यूआयबीचा किंवा क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल खरेरीदारांसाठी विशेष व्यवस्था करते.

क्यूआयबी हे सेबी नोंदणीकृत वित्तीय संस्था, बँका, म्युच्युअल फंड्स आणि एफआयआय (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) असतात, जे इतरांच्या मार्फत पैसा गुंतवत असतात. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, स्टॉकचा अंदाज घेण्यासाठी समर्पित नेटवर्क असल्यामुळे क्यूआयबीचा सहभाग हादेखील स्टॉकचा भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठीचा चांगला धागा ठरू शकतो.

आयपीओ गुंतवणूक करताना तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे सांगितले जाते. आयपीओमध्ये असलेली प्रचंड गतिमानता पाहता, त्याचे सखोल विश्लेषणदेखील केले पाहिजे. आपण चुकांसह किंवा वरवर विश्लेषण करण्यापेक्षा यातील तज्ज्ञ व्यक्ती हे काम करत असेल तर त्यालाच प्राधान्य द्यावे.

सध्याच्या घडीला, भारतात गुंतवणुकीची शिफारस करणारे अनेक इंजिन्स आहेत, जे १ अब्जापेक्षा जास्त डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करून बेंचमार्कवरील निर्णायक निकाल दर्शवतात. ते आयपीओ केंद्रित सल्लादेखील देतात, हीदेखील चांगली बातमी आहे. त्यावरून तुम्ही कोणत्या आयपीओमध्ये सहभाग घ्यावा आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे हे कळते.

गुंतवणूकदारांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाते, जेणेकरून ते माहितीपूर्ण निर्णय घेतील. आरएचपीमधयेही पक्षपातीपणा होत असला तरीही तुम्ही बारकाईने अभ्यास करत असाल तर यातूनही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज येऊ शकते. या निधीचा वापर संशोधन किंवा व्यवसाय वृद्धी दर्शवला असेल तर हे चांगले संकेत असून भविष्यात कंपनीची वृद्धी होऊ शकते.

सार्वजनिक होणाऱ्या कंपन्यांना त्यांचे व्यावसायिक कामकाज, महसूल, मालमत्ता, उत्तरदायित्व, बाजाराचा लँडस्केप आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार वाढीव निधीचा ते कशाप्रकारे वापर करणार आहेत, या सर्वांबाबत तपशीलवार माहिती देणे बंधनकारक असते.

आयपीओ जेवढे फायदेशीर असतात, तेवढीच त्यात जोखीमही असते. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. त्यामुळे उपरोक्त घटक लक्षात ठेवावेत. त्यामुळे काही अलॉटमेंट मिळवण्यासाठी आयपीओ ही नेहमीच लाभकारक संधी ठरू शकते.