वेळ झाली! वर्षभर कुठे खर्च केलात, कुठे कमाई केलात, हिशेब मांडण्यासाठी आयकरची एक्सेल शिट आली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 05:27 PM2023-04-28T17:27:55+5:302023-04-28T17:31:18+5:30

आयकर रिटर्न भरण्याची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. गेल्या वर्षाभरात तुम्ही जेजे केलेय त्याचा हिशेब मांडला जाणार आहे. तुम्ही कुठे काय खर्च केला, कुठून काय कमावले याचा लेखाजोखा मांडावा लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे ३१ जुलैपर्यंतचा वेळ असला तरी तुम्हाला त्याची आतापासूनच तयारी करवी लागणार आहे.

बरेचजण अखेरच्या क्षणी आयकर विवरणपत्र भरतात. यासाठी अकाऊंटंट किंवा सीए आदींची मदत घेतली जाते. त्यांना तुम्ही काय केले, काय नाहीय याची माहिती नसते. जेवढी तुम्हाला असते. यामुळे आपला आयकर आपणच भरावा यासाठी आयकरविभाग दोन फ़ॉर्म उपलब्ध करणार आहेत.

यासाठी तुम्हाला ITR-1 (सहज) आणि ITR-4 (सुगम) फॉर्म जारी केले आहेत. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये आयटीआर फाईल करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही तज्ज्ञाची गरज राहणार नाही. आयकर विभागाने यासाठी एक्सेलमध्ये देखील सुविधा सुरु केली आहे.

असेसमेंट इयर २०२३-२४ साठी आयकरकडून अद्याप फॉर्म उपलब्ध केलेले नाहीएत. परंतू तुम्हाला जर ऑफलाईन आयटीआर भरायचा असेल तर एक्सेल सुविधा चांगली ठरणार आहे. आयकरच्या वेबसाईटवरू ती डाऊनलोड करता येणार आहे. यानुसार तुम्ही योग्य टॅक्स कॅल्क्युलेशन करून रिटर्न दाखल करू शकणार आहात.

आयकर विभाग लवकरच यासंबंधीची इतर अपडेटेड माहिती देईल. महत्त्वाचे म्हणजे, ऑफलाइन आयटीआर फाइलिंगसाठी, करदात्यांना वेबसाइटवरून संबंधित फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

आयकर विभागाने प्रत्येकासाठी वेगवेगळे फॉर्म तयार केले आहेत. फॉर्म-16 मध्ये दिलेल्या तपशीलानुसार किंवा उत्पन्नानुसार ते भरता येणार आहेत. उत्पन्नाव्यतिरिक्त, तुम्हाला एकूण बचत आणि टीडीएसची माहिती फॉर्ममध्ये भरावी लागणार आहे.

सर्व माहिती भरल्यानंतर, हा फॉर्म स्कॅन करायचा आणि आयकर पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. आता कोणते कोणते फॉर्म तुमच्या वापराचे आहेत...

ITR-1 (सहज): 50 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी आवश्यक; ITR-4 (सुगम): हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) आणि फर्मसाठी (रु. 50 लाखांपर्यंत उत्पन्न); ITR-2: निवासी मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी.

ITR-3: व्यवसायातून नफा; ITR-5, 6: मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि व्यवसायासाठी; ITR-7 : ट्रस्टसाठी