पीएफ च्या पैशाने होम लोनची परतफेड करणे योग्य की अयोग्य? समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:42 IST2024-12-16T14:37:46+5:302024-12-16T14:42:39+5:30

आपले स्वत:चे घर असावे ही सगळ्यांची इच्छा असते. यासाठी आपण आपल्या आयुष्याची कमाई खर्च करतो.

आपले स्वत:चे घर असावे ही सगळ्यांची इच्छा असते. यासाठी आपण आपल्या आयुष्याची कमाई खर्च करतो. घरासाठी आपण कर्जही काढतो. यासाठी अनेक बँकांनी होम लोनची सुविधा दिली आहे.

होम लोनचा कालावधी खूप मोठा आहे. हे कर्ज कमी करण्यासाठी अनेकजण आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढून ते कर्जामध्ये भरले जातात. आता आपण कर्ज फेडण्यासाठी पीएफमधील पैसे काढणे बरोबर की चुकीचे याचे गणित पाहूया.

EPF ही सर्वसाधारणपणे सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक योजना आहे. परंतु, जर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर EPF वर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही ही रक्कम कर्जाच्या पूर्व पेमेंटसाठी वापरू शकता.

उदाहरणार्थ, सध्या EPF वर ८.२५ टक्के व्याजदर आहे. त्याच वेळी, बहुतेक बँका ८.५ ते १० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. जर तुमच्या गृहकर्जाचा दर ९ टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तरच तुम्ही EPF रकमेतून गृहकर्जाच्या प्री-पेमेंटचा पर्याय विचार करा.

जर तुम्ही तरुण असाल आणि तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल, तर तुम्ही EPF पैशाने गृहकर्जाची परतफेड करण्याचा पर्याय निवडू शकता, कारण तुम्हाला तुमचा सेवानिवृत्ती निधी पुन्हा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

EPFO होम लोनची परतफेड करण्यासाठी जमा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त ९० टक्के रक्कम काढण्याची परवानगी देते.

पण यासाठी तुम्हाला किमान १० वर्षांच्या सेवेची अट पूर्ण करावी लागेल. गृहकर्ज परतफेड योजनेअंतर्गत, EPFO ​​सदस्य त्यांच्या खात्यातून EMI भरू शकतात.

ईपीएफ हा तुमच्या निवृत्तीच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तिथून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. हा शेवटचा पर्याय म्हणून वापरून पाहिला पाहिजे. तसेच, ईपीएफमधून संपूर्ण रक्कम काढणे टाळावे.

सध्या यावर ८.२५ टक्के व्याज आहे. तुम्ही EPF मधून जितकी जास्त रक्कम काढाल तितका तुमच्या निवृत्ती निधीवर जास्त परिणाम होईल. तसेच, ईपीएफमधून पैसे काढताना तुम्हाला कर नियम नीट समजून घेतले पाहिजेत.

काही प्रकरणांमध्ये, कर देखील भरावा लागेल. याव्यतिरिक्त, मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.