Investment Tips: १ एप्रिलपूर्वी पत्नीच्या नावे ‘या’ ठिकाणी करा गुंतवणूक, मिळेल जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:54 IST2025-01-28T08:45:20+5:302025-01-28T08:54:37+5:30

Investment Tips Wifes Name : जर आपण अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल जे आपले पैसे मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे खात्रीशीर परतावा आणि पैसा सुरक्षित आहे, तर तुम्ही या स्कीमचा विचार करू शकता. तुम्ही पत्नीच्या नावे गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

Investment Tips Wifes Name : जर आपण अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल जे आपले पैसे मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे खात्रीशीर परतावा आणि पैसा सुरक्षित आहे, तर एफडीचा समावेश निश्चितपणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला जाऊ शकतो. एफडी वेगवेगळ्या मुदतीच्या असतात.

अशा तऱ्हेनं जर तुम्ही अशा एफडीच्या शोधात असाल जिथे तुमचे पैसे बराच काळ लॉक नसतील आणि तुम्हाला चांगला नफाही मिळेल, तर पोस्ट ऑफिसची एमएसएससी (महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट) स्कीम तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकते. या योजनेत फक्त पत्नी, बहीण, आई किंवा मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता.

महिलांसाठी सरकार महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना राबवत आहे. ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे, ज्यावर सरकार ७.५% व्याज देत आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकेल. दोन वर्षांच्या कालावधीच्या इतर कोणत्याही एफडीवर तुम्हाला इतकं व्याज सहजासहजी मिळणार नाही.

तुम्ही इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या पत्नी, बहीण, आई किंवा मुलीच्या नावे या योजनेत गुंतवणूक करून २ वर्षात भरपूर नफा कमावू शकता. पण तुम्हाला ही गुंतवणूक १ एप्रिलपूर्वी करावी लागेल कारण ३१ मार्च ही त्यात गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख आहे.

या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. एमएसएससी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या योजनेत घरातील महिलेच्या नावावर ₹ २,००,००० जमा केले तर तुम्हाला ७.५% दरानं व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळतील. यामध्ये दोन वर्षांनंतर मॅच्युरिटीची रक्कम २,३२,०४४ रुपये असेल.

तर १,५०,००० रुपये गुंतवल्यानंतर तुम्हाला दोन वर्षांनंतर १,७४,०३३ रुपये मिळतील. अशावेळी २४,०३३ रुपये केवळ व्याजासाठी मिळणार आहेत. जर तुम्ही १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी ७.५ टक्के व्याजदरानं १,१६,०२२ रुपये मिळतील आणि जर तुम्ही ५०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांत व्याज म्हणून ८०११ रुपये मिळतील आणि अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण ५८,०११ रुपये मिळतील.

जर तुम्हालाही तुमच्या घरातील महिलेच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिचं खातं उघडावं लागेल. खातं उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नसून कोणत्याही वयोगटातील मुलगी किंवा महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीच्या नावानं तुम्ही पालक खातं उघडू शकता.

नियमानुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र स्कीम २ वर्षात मॅच्युअर होते, परंतु आपल्याला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंशत: पैसे काढण्याची सुविधा मिळते. गरज पडल्यास १ वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढू शकता. समजा तुम्ही या योजनेत २ लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.