मुलांच्या भविष्यासाठी 'या' स्ट्रॅटजीनं करा गुंतवणूक; केवळ व्याजातून मिळू शकतील ₹८८,६६,७४२, २१ व्या वर्षी मूल होईल करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:26 IST2025-01-21T10:21:37+5:302025-01-21T10:26:32+5:30
Investment For Kids : मुलांच्या भवितव्याची चिंता सर्वांनाच सतावत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्लॅनिंग करतो. पण मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करणं शहाणपणाचं आहे.

Investment For Kids : मुलांच्या भवितव्याची चिंता सर्वांनाच सतावत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्लॅनिंग करतो. पण मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करणं शहाणपणाचं आहे. अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे जिथे तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकेल. आजच्या काळात एसआयपी गुंतवणूक हा एक असा पर्याय आहे जो तुम्हाला महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकतो.
म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. मार्केट लिंक्ड स्कीम असूनही या योजनेतून तुम्हाला दीर्घ मुदतीत इतका चांगला परतावा मिळू शकतो, जो इतर कोणत्याही योजनेतून मिळणार नाही. आपल्या मुलांना वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कोट्यधीश बनविण्यासाठी आपण एक फॉर्म्युला अवलंबू शकता.
हे सूत्र २१x१०x१२ आहे. या सूत्रानुसार मुलांच्या जन्माबरोबर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल आणि ही गुंतवणूक सलग २१ वर्षे सुरू ठेवावी लागेल. १० म्हणजे १०,००० रुपये म्हणजेच मुलांच्या नावावर १०,००० रुपयांची मासिक एसआयपी चालवावी लागेल आणि १२ म्हणजे परतावा. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो.
जर तुम्ही हा फॉर्म्युला लागू केला आणि मुलांच्या नावावर १०,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि सलग २१ वर्षे चालू ठेवली तर तुम्ही २१ वर्षात एकूण २५,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मोजला तर २१ वर्षांत तुम्हाला या रकमेवर व्याज म्हणून ८८ लाख ६६ हजार ७४२ रुपये मिळतील.
अशा प्रकारे २१ वर्षांनंतर गुंतवलेली एकूण रक्कम आणि व्याज १,१३,८६,७४२ रुपये होईल. अशा प्रकारे वयाच्या २१ व्या वर्षी तुमच्या मुलांकडे १ कोटींपेक्षा जास्त रक्कम असेल. या पैशातून त्याच्या भविष्यातील सर्व गरजा सहज पूर्ण होतील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)