दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:55 IST2025-10-13T16:30:38+5:302025-10-13T16:55:32+5:30
Indigo Diwali Sale 2025 : जर तुम्ही दिवाळीनंतर प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर इंडिगोचा फ्लाइंग कनेक्शन्स सेल ही एक उत्तम संधी आहे.

इंडिगो एअरलाइनने दिवाळीच्या मुहूर्तावर 'फ्लाइंग कनेक्शन्स सेल' ही खास ऑफर आणली आहे. ही सेल १३ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू आहे. या सेलमध्ये बुक केलेल्या तिकीटांवर १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रवास करता येईल.
या ऑफरमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाची तिकिटे फक्त २,३९० रुपयांपासून सुरू होत आहेत, तर आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिटे ८,९९० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
या सेलमध्ये इंडिगोने देशातील जवळपास ९० हून अधिक शहरे आणि ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय शहरांना जोडणारे ८,००० हून अधिक मार्ग समाविष्ट केले आहेत.
कोची ते शिवमोग्गा सारख्या मार्गांसाठी तिकीट केवळ २,३९० रुपयांपासून सुरू आहे. तसेच, लखनऊ ते रांची आणि पटना ते रायपूर सारख्या लोकप्रिय मार्गांवर तिकिटे ३,५९० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही मोठे सवलती जाहीर झाल्या आहेत. कोची ते सिंगापूरसाठी तिकीट ८,९९० रुपयांपासून सुरू होत आहे, तर युरोपमधील जयपूर ते ॲमस्टरडॅमसाठी १५,५९० रुपयांपासून बुकिंग सुरू आहे.
ही ऑफर केवळ इंडिगोच्या थेट विमानांवर लागू आहे. ऑफरमधील तिकिटांची संख्या मर्यादित आहे आणि हे तिकीट बदलता किंवा परत करता येणार नाही.
तिकीट बुकिंगनंतर प्रवासात कोणताही बदल करायचा झाल्यास, प्रवाशांना नियमांनुसार अतिरिक्त शुल्क भरावे लागेल आणि भाड्याचा फरकही द्यावा लागेल. ही ऑफर ग्रुप बुकिंगवर लागू नाही.
सणासुदीच्या काळात जेव्हा प्रवासाची मागणी वाढते आणि तिकिटे महाग होतात, अशावेळी इंडिगोची ही सेल प्रवाशांना कमी खर्चात अधिक ठिकाणी जाण्याचा आणि कनेक्टिंग प्रवासाचा सोपा पर्याय उपलब्ध करून देते.