नव्या वंदे भारत ट्रेनचा लूक आला समोर, अनेक सुविधांनी सुसज्ज, पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:24 PM2022-08-12T13:24:43+5:302022-08-12T13:31:07+5:30

vande bharat train : ट्रेनमधील सीट्स फ्लाइट सारख्या बनवण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : नवीन वंदे भारत ट्रेन जुन्या दोन्ही ट्रेनपेक्षा वेगळी असणार आहे. यामध्ये नवीन प्रकारच्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळतील आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

नवीन वंदे भारत ट्रेन आज आयसीएफ (ICF) चेन्नई येथून रुळावर येण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः कोच फॅक्टरीच्या पाहणीसाठी पोहोचणार आहेत. भारतीय रेल्वेने नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक स्वरुपातही अनेक बदल केले आहेत.

प्रत्यक्षात ट्रेनमधील सीट्समध्ये बदल करण्यात आला आहे. सध्याच्या वंदे भारतमध्ये सीटचा फक्त मागील भाग हलवता येतो, तर आगामी ट्रेन सेटमध्ये संपूर्ण सीट सोयीनुसार हलवता येते. ट्रेनमधील सीट्स फ्लाइट सारख्या बनवण्यात आल्या आहेत.

जसे की फ्लाइटमध्ये एजल सीट लिहिल्याप्रमाणे. यामध्येही प्रवाशांना विंडो, एजल यांसारख्या सीट्स मिळणार आहेत.फायर अलार्मही बसविण्यात आला आहे. ट्रेनमध्ये आग लागल्यास किंवा धुराचे लोट झाल्यास अलार्म वाजतो, जेणेकरून प्रवाशांना सावध करता येईल आणि गरज पडल्यास सुरक्षित बचाव करता येईल.

रेल्वेच्या डब्यात आत्मनिर्भर भारताचा लोगोही बनवण्यात आला आहे. ही ट्रेन पूर्णपणे भारतीय असल्याने पुढील 74 ट्रेन्स सुद्धा याच मॉडेलवर बनवण्यात येणार आहेत.

यापूर्वीही या ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक गेट बसवण्यात आले होते, आता या गेट्समध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना चढताना आणि उतरताना सुविधा मिळून शकेल.

नव्या ट्रेनच्या विंडोही वेगळ्या डिझाईनच्या बनवण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना बाहेरचे चांगले दृश्य पाहता येईल. त्याची गुणवत्ताही पूर्वीपेक्षा चांगली करण्यात आली आहे.