India Post Payments Bank लवकरच FASTag सर्व्हिस लाँच करणार, मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडण्याचंही लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:22 AM2024-02-20T09:22:13+5:302024-02-20T09:31:18+5:30

इंडियन पोस्ट पेमेंट बँकदेखील फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने फास्टॅग युजर्ससाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बँकांच्या यादीतून पेटीएम पेमेंट बँकेला वगळले आहे. त्यामुळे या बँकेचे फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना इतर बँकेचे फास्टॅग घ्यावे लागतील. जवळपास २ कोटी वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे. युजर्सना पेटीएमचे फास्टॅग परत करून इतर बँकांकडून खरेदी करावे लागतील. अनेक बँकांनी फास्टॅग बदलून घेण्याची (पोर्टिंग) सुविधा दिली आहे.

दरम्यान, आता इंडियन पोस्ट पेमेंट बँकदेखील फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ व्ही. ईश्वरन यांनी मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादादरम्यान यासंदर्भातील माहिती दिली.

पोस्ट पेमेंट बँकेसोबत सातत्यानं मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ती लाँच केली जाणार असल्याचं ते म्हणाले. या वर्षाअखेरिस नवे ग्राहक जोडण्यासाठी ३० टक्क्यांच्या वाढीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. आम्ही ८.५ कोटी ग्राहकांची संख्या पार केली आहे आणि हा आकडा वाढता आहे, असंही ते म्हणाले.

पोस्ट पेमेंट बँकेसोबत सातत्यानं मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ती लाँच केली जाणार असल्याचं ते म्हणाले. या वर्षाअखेरिस नवे ग्राहक जोडण्यासाठी ३० टक्क्यांच्या वाढीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. आम्ही ८.५ कोटी ग्राहकांची संख्या पार केली आहे आणि हा आकडा वाढता आहे, असंही ते म्हणाले.

त्यांना भारतात सुरुवातीपासूनच पेमेंट्स बँकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्या पेमेंट्स बँका सध्या ऑपरेट करत आहेत, त्यांचं आपलं मार्केट आहे. सर्वांनी आपल्यासाठी एक सेगमेंट तयार केलंय. पेमेंट्स बँकेनं गेल्या काही वर्षात आपली व्याप्ती वाढवल्याचं व्ही ईश्वरन म्हणाले.

या बाबतीत टियर-२, टियर-३ आणि टियर-४ शहरांमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि पेमेंट्स बँकेनं खूप चांगलं काम केलं आहे. नफ्याबाबत आव्हानं आहेत, परंतु आपण निश्चितरित्या बिझनेस जनरेट करू शकतो हे इंडिया पोस्टनं सिद्ध केलंय. आव्हानांवर मात करून इंडिया पोस्ट अधिक मजबूतीनं वर येईल, असंही ते म्हणाले.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक थर्ड पार्टीद्वारे म्युच्युअल फंड आणि विमा संबंधित व्यवसायात उतरण्याची तयारी करत आहे का असं विचारलं असता, ते म्हणाले की पेमेंट बँक थर्ड पार्टी उत्पादनांचा वापर करून विमा वितरणाचं काम करत आहे. जीवन विमा, सामान्य आणि आरोग्य विमा यांची विक्री केली जाते. बँकिंग करस्पाँडंट मायक्रो एटीएमद्वारे हे व्यवहार करत आहेत.