शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

RBI चे महत्त्वाचे आदेश; 'या' नोटा असतील तर होणार मातीमोल, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 6:14 AM

1 / 8
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता नोटांचीही फिटनेस चाचणी होणार आहे. अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात.
2 / 8
मात्र, आता आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. जर तुमच्या पाकिटातील नोट फिटनेस चाचणीत फेल ठरल्या तर त्या वापरता येणार नाहीत.
3 / 8
आरबीआयने काय दिले आदेश? रिझर्व्ह बँकेने बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची फिटनेस तपासण्यासाठी नवीन मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकिंग प्रणालीमध्ये अनेक वर्षांपासून खराब नोट चालत आलेल्या आहेत.
4 / 8
आरबीआयच्या या सूचनेनुसार नोटांचा फिटनेस तपासला जाईल. तुमच्या खिशात ठेवलेली नोट योग्य की अयोग्य आहे? हे तपासण्यासाठी आरबीआयने ११ मानके निश्चित केली आहेत.
5 / 8
रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागणार - फिटनेस टेस्टमध्ये कोपरे दुमडलेल्या, गोंद किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील. बँकांना प्रत्येक तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस टेस्टबाबत रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागेल. कोणकोणत्या नियमांना किती नोटा पूर्ण करू शकल्या नाहीत, हे अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे.
6 / 8
या नोटा ठरणार खराब - कोपरे दुमडलेल्या, अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेल्या, भरपूर धूळ असलेल्या, नरम पडलेल्या नोटा, ८ चौरस मिलीमीटर पेक्षा मोठे छिद्र असलेली नोट, नोटमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाणार
7 / 8
नोटेवर खूप डाग, पेनाची शाई असेल तर, नोटांवर काही लिहिले असल्यास किवा कोणत्याही प्रकारच्या पेंटिंग असल्यास, नोटेचा रंग उडाला असेल तर फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप, नोटांचा रंग गेला असल्यास
8 / 8
चांगल्या नोटा कुठे मिळणार? - आतापर्यंत नोट सॉर्टिंग मशीनमध्ये फक्त खऱ्या आणि बनावट नोटांची ओळख होत होती. त्यामुळे नोटा वाईट स्थितीत पोहोचल्या होत्या. सध्या  सर्व नोटा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नोटांची वर्गवारी करणारी यंत्रे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. बँक ग्राहकांची नोट नाकारून त्याऐवजी ग्राहकाला दुसरी नोट देईल.
टॅग्स :MONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक