By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:20 IST
1 / 7Home Loan EMI: वाढती महागाई आणि वाढलेल्या घरांच्या किंमतींमुळे स्वतःचे घर घेणे आज अनेकांसाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळेच बहुतांश लोकांना होम लोनचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, लोन घेण्यापूर्वी त्याची EMI, व्याजदर आणि इतर अटी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर एखाद्या व्यक्तीने २५ लाख रुपयांचे होम लोन घेतले, तर त्यावर दरमहा किती EMI भरावी लागेल, हे समजून घेऊया.2 / 7विविध बँकांचे व्याजदर आणि EMI- HDFC बँक सुमारे ७.७५% व्याजदरावर २५ वर्षांसाठी जवळपास ₹२०,५२४ EMI आकारते. कॅनरा बँक ७.४०% ते ८.९०% दरम्यान व्याजदर देत असून, EMI अंदाजे ₹२०,००० ते ₹२२,५०० दरम्यान जातो. कोटक महिंद्रा बँक ७.७०% ते ८.७०% दरावर EMI सुमारे ₹२०,००० ते ₹२२,००० आहे, Axis बँक ८.४०% ते ८.५०% व्याजदरावर EMI ₹२१,५०० ते ₹२२,५०० पर्यंत जातो, तर SBI देखील ८.४०% ते ८.५०% दरावर EMI सुमारे ₹२१,५०० ते ₹२१,६५० आकारते.3 / 7१. व्याजदरांची तुलना करा- वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर आणि अटी वेगळ्या असतात. योग्य तुलना केल्यास EMI आणि एकूण खर्च कमी करता येतो.4 / 7२. अर्ज शुल्क- कर्जासाठी अर्ज करताना एक फी भरावी लागते, जी परत मिळत नाही. त्यामुळे आधीच योग्य बँक निवडणे गरजेचे आहे.5 / 7३. मॉर्गेज डीड चार्ज- लोन घेताना मॉर्गेज डीडसाठी वेगळा खर्च करावा लागतो. काही बँका हा शुल्क माफ करतात, त्यामुळे आधी माहिती घेणे फायद्याचे ठरते.6 / 7४. प्रॉपर्टीची कायदेशीर पडताळणी- बँक प्रॉपर्टी तपासण्यासाठी वकील नेमते आणि त्याचा खर्च ग्राहकाकडून घेतला जातो. त्यामुळे आधीच बँकेकडून मंजूर प्रॉपर्टी निवडल्यास अतिरिक्त खर्च टाळता येतो.7 / 7 ५. प्रीपेमेंट चार्ज- लोन वेळेआधी फेडल्यास काही बँका प्रीपेमेंट चार्ज आकारतात. हा दर प्रत्येक बँकेनुसार वेगळा असतो, त्यामुळे लोन घेण्यापूर्वी याची माहिती घेणे आवश्यक आहे.