PNB मधून ₹५० लाखांचं Home Loan लोन घेण्यासाठी किती असली पाहिजे Salary, किती लागेल EMI?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 08:38 IST2026-03-23T08:26:08+5:302026-03-23T08:38:32+5:30

PNB Home Loan Salary and EMI: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे ईएमआयचा भार हलका झाला असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

PNB Home Loan Salary and EMI: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे ईएमआयचा (EMI) भार हलका झाला असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. ईएमआय कमी झाल्यामुळे लोकांचा मासिक खर्च कमी झाला असून त्यांची बचत वाढली आहे.

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरांवर गृहकर्ज उपलब्ध करून देत आहे. बँक केवळ ७.२० टक्क्यांच्या सुरुवातीच्या दरानं गृहकर्ज देतेय. जर आपण ३० वर्षांसाठी ७.२०% व्याजदरानं ५० लाख रुपयांचं गृहकर्ज घेणार असाल, तर त्यासाठी मासिक पगार किती असावा आणि दरमहा किती ईएमआय येईल, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्ज व्याजदर ७.२० टक्क्यांपासून सुरू होत आहेत. जर आपण ७.२०% व्याजदराने ३० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले, तर आपला मासिक पगार किमान ६८,००० रुपये असणं आवश्यक आहे.

या हिशोबानुसार, आपल्या नावावर इतर कोणतंही कर्ज सक्रिय नसावं. या व्याजदराने ५० लाखांच्या कर्जासाठी आपल्याला दरमहा सुमारे ३४,००० रुपये ईएमआय भरावा लागेल. गृहकर्जाच्या बाबतीत आपल्या पगाराचा साधारण अर्धा हिस्सा कर्जाच्या हप्त्यामध्ये जातो, हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे.

गृहकर्ज हे दीर्घकालीन कर्ज असतं, त्यामुळे कोणतीही बँक कर्ज देण्यापूर्वी ग्राहकाचा क्रेडिट स्कोर (Credit Score) आणि लोन हिस्ट्रीची कडक तपासणी करते. गृहकर्ज घेण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर उत्तम असणे आवश्यक आहे.

जर क्रेडिट स्कोर चांगला नसेल, तर बँक आपला अर्ज फेटाळू शकते. याउलट, जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल, तर आपण व्याजदरात सवलत मिळवण्यासाठी बँकेशी बोलणी करू शकता.

अनेकदा चांगल्या क्रेडिट स्कोरमुळे बँका व्याजदरात अधिक चांगल्या ऑफर देऊ शकतात. म्हणूनच, गृहकर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी केवळ एकाच बँकेवर अवलंबून न राहता, विविध बँकांमध्ये जाऊन सर्वोत्तम ऑफरचा शोध घेणं फायदेशीर ठरतं.