गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:10 IST2025-09-26T12:50:48+5:302025-09-26T13:10:49+5:30

World's Heaviest Gold Dress : सध्या दुबईत सुरू असलेल्या शारजाह वॉच अँड ज्वेलरी एक्स्पोमध्ये एका सोन्याच्या ड्रेसने जगाचे लक्ष्य वेधून घेतलं आहे.

जगातील सर्वात अनोखी आणि वजनदार ड्रेस म्हणून 'दुबई ड्रेस'ने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या खास पोशाखाने शारजाह येथील ज्वेलरी एक्स्पोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सौदी अरेबियातील अल रोमाइजान गोल्ड ॲन्ड ज्वेलरी कंपनीने हा खास ड्रेस तयार केला आहे. हा ड्रेस पूर्णपणे २१ कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आला आहे.

या दुबई ड्रेसचे एकूण वजन तब्बल १०.०८१२ किलोग्राम (१० किलोपेक्षा जास्त) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या सोन्याच्या पोशाखाची किंमत सुमारे ११ कोटी रुपये (४.६ दशलक्ष एईडी) इतकी आहे.

या दागिन्यांची रचना अमिराती सांस्कृतिक वारसा आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन केली आहे. यात रंगीबेरंगी मौल्यवान दगड आणि अत्यंत आकर्षक आणि बारीक नक्षीकाम केलेले आहे.

हा ड्रेस एकाच वेळी ४ प्रमुख दागिन्यांनी तयार केला आहे. ३९८ ग्रॅमचा सोन्याचा मुकुट, ८.८ किलोचा हार, ईअररिंग्स आणि 'हेअर' पीस यांचा यात समावेश आहे.

सध्या ही मौल्यवान कलाकृती शारजाहमध्ये सुरू असलेल्या वॉच ॲन्ड ज्वेलरी एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

या ड्रेसचे प्रदर्शन हे यूएईची सोन्याच्या बाजारपेठेत जागतिक नेतृत्व मिळवण्याची महत्त्वाकांक्षा दिसते. अबूधाबीच्या कारागिरांची अनोखी सर्जनशीलता यातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.